अमेरिकाही समान आयात शुल्क लावेल – ट्रम्प

वॉशिंग्टन – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरील भेटीच्या काही तास आधी अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नवीन आदेशावर स्वाक्षरी करत घोषणा केली की जो देश अमेरिकेच्या निर्यात होणार्या सामानावर जेवढा आयात कर लावेल अमेरिकाही आपल्याकडे आयात होणार्या त्या देशातील वस्तूंवर तेवढाच कर लावेल.

डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती झाल्यापासून व्यापाराला त्यांनी खूप महत्व दिले असून अमेरिका ग्रेट अगेन हे त्यांचे स्वप्न आहे व यासाठी अमेरिके बरोबरील व्यापार हा समान असला पाहिजे असे त्यांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेवर येताच चीनी कंपन्यांच्या आयात शुल्कावर अतिरीक्त दहा टक्के आणि कॅनाडा व मेक्सिकोतून होणार्या आयात शुल्कामध्ये 25 टक्क्यांची वाढ केली आहे.
ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार शुक्रवारी एका आदेशावर स्वाक्षरी केली असून यानुसार आता अमेरिकेच्या वस्तूंवर जो देश जेवढा आयात कर लावेल तेवढाच आयात कर अमेरिकाही आपल्या देशात आयातील मालावर लावेल. यामुळे भारतालाही याचा फ टका बसणार आहे.

भारत अमेरिकी मालावर जास्त कर लावतोय – ट्रम्प
ट्रम्प यांनी मागील दोन तीन महिन्यांपासून सतत ओरड सुरु केली आहे की भारत अमेरिकन मालावर जास्त आयात शुल्क लावत असल्याने व्यापारात असंतुलन निर्माण झाले आहे आणि यासाठी भारताने हे आयात शुल्क कमी करावे. परंतु अमेरिकेचा हा आरोप भारताने फे टाळला आहे.
