रविवार विशेष – नोकरी हवी आहे का ? पाहा या संधी

सी-डॅक (C-DAC) मध्ये 740 पदे
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आयटीक्षेत्रातील दिग्गज विभाग असलेल्या सी-डॅक विभागात विविध पदांसाठी भरती.
पदांची संख्या – 740
अर्ज करण्याची तारीख – 1 फे ब्रुवारी ते 25 फे ब्रुवारी 2025 आहे.
पात्रता – 1. संबंधी विषयामध्ये पदवी/पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक.
2. अर्जा बरोबर सीजीपीए/डीजीपीए/ओजीपीए किंवा लेटर ग्रेड प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
3. जे उमेदवार पदवीचे शिक्षण घेत आहेत व शेवटच्या सेमिटरची परिक्षा देत असतील त्यांनाही अर्ज करता येतील.
वयोमर्यादा – 35 ते 40 वर्ष
वेतन – विविध पदासाठी 4.49 ते 22.9 लाख वार्षीक
अर्जकरण्यासाठी लिंक – careers.cdac.in

सर्वोच्च न्यायालात 241 पदांची भरती
सर्वोच्च न्यायालयात 241 पदांची भरती करण्यात येणार आहे .
पदांची संख्या – 241
अर्ज करण्याची तारखी – 5 फे ब्रुवारी ते 8 मार्च 2025
पात्रता – 1. कोणत्याही विषयातील पदवी
2. कॉम्प्युटरवर इंग्रजी भाषेतून टायपिंगची स्पीड 35 प्रति शब्द मिनिट आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान आवश्यक.
जास्तीत जास्त –वयो मर्यादा 30 वर्ष.
वेतन – 72,040
निवड चाचणी – लेखी परिक्षा, टायपिंग चाचणी, कागदपत्रांची पडताळणी
अर्ज करण्यासाठी लिंक – www.sci.gov.in

एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात भरती
एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात 224 पदांसाठी भरती प्रकिया करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची तारीख – 4 फे ब्रुवारी – अंतिम तारीख 5 मार्च 2025
पात्रता – विविध पदानुसार पात्रता 10 वी पास, बी.कॉम., हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी, 2 वर्षाचा कामाचा अनुभव.
वयोमर्यादा – जास्तीत जास्त वय – 30 वर्ष
वेतन – 31,000 ते 1,10,000/- प्रति महिना.
भरतीची प्रकिया – लेखी परिक्षा.
अर्ज करण्याची लिंक – www.aai.aero

गुजरात उच्च न्यायालयात 212 पदांची भरती
गुजरात राज्यातील उच्च न्यायालयात 212 पदांसाठी भरती निघाली असून
अर्जाची तारीख – 1 फे ब्रुवारी ते शेवटची तारीख 1 मार्च 2025
पात्रता – 1.कायद्याची पदवी स्थानिय भाषा गुजरातीमध्ये 2. प्रॉफि शिएंसी चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक
वयोमर्यादा – जास्तीत जास्त वयोमर्यादा – 35 वर्ष
वेतन – 77,840 ते 1,36,520/- प्रति महिना
भरतीय प्रकिया – लेखी परिक्षा
अर्जाची लिंक – hc-ojas.gujarat.gov.in
