देश-विदेश

दिल्लीत भगवा फ डकला

आपचा दारुण पराभव, काँग्रेस भोपळाही फ ोडू शकला नाही, भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत
प्रवेश वर्मा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये सर्वांत पुढे
नवी दिल्ली – सलग 12 वर्षापासून सत्तेत असलेल्या व आपण सर्वांत स्वच्छ प्रतिमेचे असल्याचा दावा करणारे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारचे अखेर पतन झाले असून 27 वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर भाजपने पूर्ण बहुमाताने सरकार स्थापनेच्या दिशेने झेप घेतली आहे.


दिल्ली विधानसभेच्या 70 जागांच्या निवडणूकीसाठी 5 फे ब्रुवारीला मतदान झाले होते आणि शनिवारी 8 तारखेला मतमोजणी सुरु झाली. सकाळपासूनच इलेक्ट्रॉनिक वाहिण्यांवर मतमोजणीचे थेट प्रक्षेपण सुरु होते आणि पहिल्या फे रीपासूनच भाजपने आघाडी घेतल्याच दिसून आले.


सकाळी पोस्टल मतपत्रीकांची मोजणी सुरु झाली आणि त्यानंतर इलेक्टॉनिक मशिनमधील मतांची मोजणी सुरु झाली झाली. भाजपने सुरुवातीपासून 40 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली होती आणि पुढील काही तासांमध्येच ही आघाडी 45 जागांपेक्षा जास्त झाली.


दिल्लीतील सर्वांत चर्चेची जागा राहिली ती नवी दिल्ली विधानसभा. येथून आपचे संयोजक व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उभे होते व त्यांच्या विरोधात भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दिक्षीत उभे होते. भाजपच्या प्रवेश वर्मानी अरविंद केजरीवाल यांचा 3000 पेक्षा अधिक मताने पराभव केला. केजरीवालांना 22,057 तर प्रवेश वर्माना 25057 आणि संदीप दिक्षीत यांना 3,873 मते पडली. तर दुसरी चर्चेतील जागा म्हणजे जंगपूरा विधानसभा मतदारसंघ राहिला असून येथून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री मनिष सिसोदीया यांचा भाजपच्या तरविंदर सिंह वकिल यांनी केवळ 572 मतांनी पराभव केला. सिसोदीया यांना 34,060 मते आणि तरविंदर सिंहना 34,632, काँग्रेसच्या फ रहाद सूरीना 6,866 मते पडली.


दिल्लीतील दुसरी प्रतिष्ठेची जागा म्हणजे कालकाजीनगर असून येथून वर्तमान मुख्यमंत्री अतिशी मार्लेना यांनी निसटता विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपच्या रमेश बिधुडी यांचा 989 मतांनी पराभव केला. अतिशी यांना 41,530 तर बिधुडीना 40,541 आणि काँग्रेसच्या अलंका लांबा यांना 3,377 मते मिळाली आहेत.
दुपारी 3 वाजेपर्यंत दिल्ली विधानसभेची स्थिती
एकूण जागा -70 बहुमतासाठी जागा 36
पक्षाचे नाव जिंकलेल्या जागा आघाडीवर असलेल्या जागा एकूण मिळणार्‍या जागा
भाजप 22 25 47
आप 11 12 23
काँग्रेस 00 00 00
अपक्ष व इतर 00 00 00

काँग्रेसची परत एकदा निराशा
काँग्रेस पक्षाने दिल्ली विधानसभेच्या सर्वांच्या सर्व 70 जागा स्वबळावर लढविल्या होत्या परंतु त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही व त्यांचा परत एकदा दारुन पराभव झालेला आहे. 2019 मध्येही त्यांना एकही जागा जिंकता आलेली नव्हती. मागील 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून काँग्रेस दिल्लीत सत्तेपासून दूर आहेच परंतु एकही सदस्य त्यांचा निवडून आलेला नाही.


लोकसभा निवडणूकीमध्ये काँग्रेसने आप बरोबर युती केली होती व सात पैकी तीन जागा लढविल्या होत्या परंतु काँग्रेस व आप या दोनीही पक्षांचा सपाटून पराभव झाला व त्यांना एकही जागा जिंकता आलेली नव्हती त्यानंतर पक्षातून स्वबळाचा आवाज उठू लागल्याने काँग्रेसने यावेळी सर्व जागा लढविल्या होत्या परंतु त्यांच्या पदरात निराशच पडली आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button