केेंद्रिय अर्थसंकल्प ः प्रमुख पाच मुद्दांवर केंद्रित अर्थ संकल्प

वृत्तपर्वच्या दृष्टिकोणातून 2025 चा अर्थसंकल्प
नवी दिल्ली – केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शनिवारी सादर केलेल्या आपल्या सलग आठव्या अर्थसंकल्पात यावर्षी प्रमुख पाच बिंदूवर लक्ष्य केंद्रित केले असून यातून पुढील पाच वर्षातील केंद्र सरकारच्या उद्दिष्टांचा संक्षिप आराखडा सादर केला आहे.
केंद्रिय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा पाच बिंदूवर लक्ष्य केंद्रित करणारा असल्याचे सांगितले आहे. यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे या अर्थसंंकल्पात मध्यमवर्गाला अनेक प्रकाराचा दिलासा दिल्याचे सांगितले आहेे.

सादर केलेल्या या अर्थसंकपाचा जो पाया आहे आणि ज्या पाच प्रमुख स्तंभावर भर दिला गेला आहे त्यात 1. अर्थव्यस्थाच्या विकासात गती आणणे. 2. समावेशी विकास सुनिश्चित करणे. 3. खाजगी गुंतवणूकदारांमध्ये नवसंजीवनी निर्माण करणे 4. कुटुंबाच्या भावनामध्ये उत्साह निर्माण करणे आणि 5. भारतातील वाढत्या मध्यम वर्गाची खर्च करण्याची शक्ती वाढविणे आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी यातून बर्याच वर्षापासून मध्यम वर्गाची जी नाराजी होती ती दूर केली आणि पुढील वर्षांमध्ये मध्यम वर्गाला अर्थव्यवस्थेत प्रथम पंसतीचे स्थान मिळेल याचीही तरतूद त्यांनी केल्याचे दिसून येत आहे. कोविड काळानंतर अर्थव्यवस्था सुधारली होती परंतु मागील दोन वर्षात अर्थव्यवस्थेत एक सुस्तपणा आला होता त्याला नव्याने गती देत प्रज्वलीत करण्याचा हा एक प्रयत्न आहे असेच दिसून येत आहे.
