महाकुंभतील भक्तांच्या गर्दीमुळे 5 फे ब्रुवारीपर्यंत वाराणशीमध्ये बाहेरील गाड्यांना येण्यास बंदी

वारणशी (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळाव्यात येणारे भक्त हे गंगास्नानानंतर लगेच जवळ असलेल्या काशी अर्थात वाराणशीमध्ये दर्शनाला येत असलेल्यामुळे भक्तांच्या गर्दीमुळे काशीशहरात मोठी वाहतुक समस्या निर्माण झाली असल्याने भक्तांच्या गाडयांच्या मोठयाच मोठया रांगा लागत असल्याने स्थानिक प्रशसानाने 5 फे ब्रुवारीपर्यंत बाहेरील गाडयांना शहरात येण्यास बंदी केली आहे.
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळाव्यात येणार्या लोकांची संख्या कोटीच्या घरात गेली असून भक्तगंण गंगास्नानानंतर काशीमध्ये येवून विश्वनाथाचे दर्शन करण्यासाठी येत असलेल्याने शहरात वाहतुक कोेंडीची समस्या वाढत असून गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत, त्यामुळे गाड्या उभे करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. या कारणास्तव स्थानिक प्रशसानाने निर्णय घेतला आहे की, उत्तर प्रदेश राज्य महामार्ग परिवहन मंडळ (UPSRTC) च्या सोनभद्र. विंध्याचल, चंदौली, वाराणशी ग्रामीण आणि कैंटी डिपोच्या बस वगळता इतर कोणत्याही मग त्या (UPSRTC) च्या असो किंवा अन्य खाजगी वाहने असली तरी त्यांना शहरात प्रवेश मिळणार नाही.
वाराणशीतील वाढत्या गर्दीला पाहता वाहतुक पोलिसांनी शुक्रवारी 24 जानेवारी ते 5 फे ब्रुवारी पर्यंत बाहेरील वाहनाना शहरात प्रवेश बंदी केली आहे. शहराकडे येणारे मोठे प्रवासी वाहने शहराच्या बाहेरच थांबतील आणि तीर्थयात्रीसाठी अस्थायी पार्किगची व्यवस्था कोठे आहे याची माहिती देण्यासाठी सहाय्याता केंद्राची स्थापना केली जाईल.

पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार आझमगढ, जौनपुर आणि गाझीपूरहून येणार्या बस ह्या हरहुआच्या पुढे जाणार नाहीत आणि या सर्व बससेंना पार्किंग क्षेत्र पी-1, पी-2 आणि पी-3 मध्ये थांबविले जाईल आणि येथून तिर्थयात्रीना इलेक्ट्रिक किंवा सीटी बसच्या माध्यमातून शहरात नेले जाईल आणि शहरात येणारे भक्त हे कार्तिक मेमोरीअल ग्राउंडहून ऑटो रिक्षाने आपल्या मुक्कामापर्यंत जावू शकतील
.
याचबरोबर सोनभद्र,प्रयागराज आणि मिर्झापूरहून येणार्या बस ह्या मोहंसाराय येथील पी-15, ट्राँसपोर्ट नगर ग्राउंडवर पार्क केल्या जातील. तसेच जगतपुर इंटर कॉलेजवरुन कोणतेही चार चाकी वाहन हे त्यांचे रजिस्ट्रशन नंंबर वाराणशी यूपी-65 नसेल ते वाहन शहरात प्रवेश करणार नाही. असे वाहने जगतपुर इंटर कॉलेजच्या पी-4 वर पार्क केल्या जातील. येथून यात्री हे सायकल/ऑटोरिक्षा करुन जाऊ शकतात.

शहरातील अखरी बायपासवरुन शहरात प्रवेश करणारे वाहने यूपी-65 नोंदणीकृत वाहनाच प्रवेश करता येईल व बाकीच्या अन्य कोणत्याही वाहनाना प्रवेश करण्यास मनाई केली गेली आहे. अशा वाहनाना पार्किंग -5, संत रविदास घाट ग्राउंड वर पार्किंग करता येईल. सोनभद्र, विंध्याचल, चंदौली वारायणशी ग्रामीण आणि कँट डिपोहून येणारी वाहने ही मोहनसराय, चौकाघाट, आणि लहरतारा मार्गे कँटला पोहचतील. शहरातील बस सेवा 5 फे ब्रुवारी पर्यंत निलंबीत करण्यात आली आहे.
