बीड
ऊसाच्या ट्रॉलीला मोटर सायकल धडकल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

केज – तालुक्यातील ढाकेफळ येथील एक तरुण शेतकरी रात्रीच्या वेळी शेताला पाणी देऊन घरी परत येत असताना एका उसाच्या ट्रॉलीला त्याची मोटरसायकल धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ढाकेफळ येथील शेतकरी सुभाष रतन अंधारे हा शेतीला पाणी देऊन काम संपवून आपल्या घरी परत येत असताना त्याची मोटरसायकल एका उसाच्या ट्रॉलीला धडकली त्यात तसा जागीच मृत्यू झाला आहे.
