23 जानेवारी रोजी जिल्ह्यातील तहसीलकार्यालयासमोर बांधकाम कामगारांचे धरणे
बीड ( ) जिल्ह्यातील व राज्यातील बांधकाम कामगारांचे नोदणी,नुतणीकरण व लाभाचे वाटपामधील घोटाळे लपवण्यासाठी पब्लीक पोर्टल बंद करुन या कामासाठी खाजगी कंत्राट देण्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या निर्णया विरोधात व पब्लीक पोर्टल पुर्ववत करावी यासाठी बीड जिल्ह्यातील तहसील व उपविभागीय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दि.23 जानेवारी 2025 रोजी धरणे आंदोलन करुन शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय बांधकाम कामगार संघटनांच्या संयूक्त कृती समितीने घेतल्याची माहिती राजकुमार घायाळ यांनी दिली.

नोंदणीकृत कामगार संघटनाच्या प्रतिनिधीची बैठक हमाल भवन,जुना मोंढा बीड येथे घेण्यात आली.सदर बैठकीत संयूक्त कुती समितीच्या कामकाजा बाबत निर्णय घेण्यात आले .बीड जिलह्यात नोंदणी व लाभाचे वाटपाचे घोटाळे मोठया प्रमाणात झाले त्याची चौकशी समिती द्वारे चौकशी करुन असे घोटाळे करणारावर गुन्हे दाखल करावेत मंडळाच्या कामकाजाचे धोरणाची पुनर्रचना.करावी या व इतर मागण्याचा शेवट पर्यंत पाठपूरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला सदरील बैठकीत घेण्यात आला
राजकुमार घायाळ,शेरजमाखान पठाण,बबन घुमरे,कॉ.बी.जी.खाडे.शेख मैनुद्दिन(पेंटर),शेख सादेक,अजीत मोरे,रामभाऊ बादाडे, सादेक पठाण, राजु भोले,अझर सिद्दीकी,कडुदास कांबळे,शेख रहीम,बंडु दळवी,प्रमीलाताई माळी,शेख समीर,रवी मुडेगावकर,चक्रधर घोडके,नवीदखान पठाण,शेख युनूस,भारत देशमाने,ओम पूरी,तौफीक काझी,वैभव पोकळे,शेख शफीक,सत्यनारायण गळगुंडे,ऋषिकेश स्वामी,मंगेश जोगदंड,शेख सिराज,सय्यद सलीम,सय्यद शेख हमीद,फिरोज,आयान सय्यद,गणेश वीर,रिजवान शेख,यांनी असंख्य बांधकाम कामगारांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे.असे आवाहन केले