तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू

तिरुपती – तिरुपती बालाजी मंदिरात वैकुंठ एकादशी आणि वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन मिळविण्यासाठी अचानक भक्तींची मोठी गर्दी जमा झाल्याने मंदिरात एकच गोंधळ उडाला व याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भक्तांचा मृत्यू झाला.
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात वैकुंठ एकादशी व वैकुंठ द्वार दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी जमा होत आहे. याला पाहता तिरुपती तिरुमला देवस्थान (टीटीडी) मंदिर व्यवस्थापनाने भक्तांसाठी टोकन पध्दत सुरु केली. बुधवारी वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन घेण्यासाठी भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केल्याने सर्वच व्यवस्था कोलमंडली गेली. 10 ते 19 जानेवारी पर्यंत चालणार्या या कार्यक्रमासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
भक्तांची होत असलेली मोठया गर्दीला पाहता टीटीडीने टोकन पध्दत लागू केली आहे. या टोकनसाठी प्रत्येक भक्ताकडून 50 रुपये घेतले जात असून हे टोकन घेतले तरी भक्तांना एक किंवा दोन दिवसापर्यंत आपला नंबर येण्याची वाट पहावी लागत आहे. तसेच या ठिकाणी व्हिआयपी कोटयातून टोकन पाहिजे असेल तर 300 रुपये द्यावे लागतात. या कोटयातील लोकांना लवकर दर्शन होते परंतु गर्दी वाढल्यास या कोटयातील लोकांना एक दिवसापेक्षा अधिक कालावधी लागतो आहे. भक्तगण या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करु शकतात, पोस्ट ऑफि स किंवा एपीटीद्वारेही बुकिंग करु शकतात.
वृध्द व दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था – टिटीडीने या कालावधी येणारे वृध्द व दिव्यांग भक्तांसाठी विशेष व्यवस्था केली असून मंदिरा जवळी एका वेगळ्या प्रवेशद्वारातून दर्शनाची सोय केली आहे. यासाठी या गटातील लोकांसाठी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 3 वाजता वेळ राखीव ठेवला आहे. शुक्रवार व बुधवारसाठी या वर्गातील लोकांना दुपारी 3 च्या वेळेसाठी 1 हजार टोकनची व्यवस्था करण्यात आली आहे.