सनीभूषण व दिपश्री लग्नबंधनात

सध्या लग्नाचा मोसम सुरु झाल्यापासून अनेक मराठी कलावंतानी आप आपल्या जोडीदारां बरोबर लग्नगाठ बांधली असून त्यात हस्यजत्राद्वारे चाहत्यांना हसविणारा सनीभूषण मुणगेकर व अभिनेत्री दिपश्री कवळे यांनी विवाह केला आहे.
मराठी वाहिनीवर हस्य विनोदाद्वारे प्रक्षेकांचे मनोरंजन करणारा सनीभूषण मुणगेकर यांने मराठी कलाविश्वातील अभिनेत्री दिपश्री कवळेशी विवाह केला असून त्यांनी समाजमाध्यमांवर आपल्या विवाहाचे फ ोटोही चाहत्यांसाठी टाकले आहेत आणि त्याखाली त्यांनी श्री व सौ मुणगेकर असे कॅप्शन लिहिले आहे.
सनीभूषणने मुलगी पसंत आहे या मालिकेत काम केले असून तो सध्या अलबत्या गलबत्या नाटकाद्वारे प्रक्षेकांच्या भेटीला आला आहे. त्याची सर्वांत गाजलेली विनोदी भूमिका ही हस्यजत्रामध्ये राहिली आहे. तर दिपश्रीही पण मराठी कलाविश्वातील अभिनेत्री असून तिनेही बाळूमामाच्या नावाने चांगभलं, गाथा नवनाथांची, जागो मोहन प्यारे या मालिकांमधून आपल्या अभियानाचा ठसा उमटविला आहे.