ताज्या बातम्यादेश-विदेश

दिल्ली विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले

नवी दिल्ली – बहुप्रतिक्षीत दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा केंद्रिय निवडणूक आयोगाने मंगळवारी केली असून एकाच टप्प्यात दिल्ली राज्यात 5 फे ब्रुवारी 2025 ला मतदान होणार आहे आणि 8 फे ब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
मागील वर्षी 2024 मध्ये लोकासभा निवडणूकीनंतर प्रथम हरियाणा व जम्मू आणि काश्मिर आणि त्यानंतर महाराष्ट्र व झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या आणि यात हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने परत एकदा सत्ता मिळवली आहे तर जम्मू आणि काश्मिरमध्ये स्थानिक राजकिय पक्ष नॅशनल काँफ्र ॉन्सने आणि झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसने मिळवून सत्ता मिळवली आहे. या निवडणूकानंतर आता दिल्ली विधानसभेचे वेध लागले होते आणि जानेवारीत निवडणूकीची घोषणा होईल असे बोलले जात होते. 7 जानेवारीला मंगळवारी निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणूक तारखेची घोषणा केली आहे.

दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी निवडणूका होणार आहेत आणि यासाठी 10 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे व 17 जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 20 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे व 5 फे ब्रुवारीला मतदान आणि 8 फे ब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीमध्ये यावेळी एकूण मतदार हे 1 कोटी 55 लाख असून यात 71 लाख महिला व 83.49 लाख पुरुष मतदार आहेत.


आप-भाजप-काँग्रेसमध्ये मुख्य लढत
दिल्ली विधानसभेच्या निवडणूका घोषीत झाल्या असून या ठिकाणी सत्ताधारी आम आदमी पक्षा (आप), भारतीय जनता पक्ष (भाजप) व काँग्रेस पक्षात मुख्य लढत होणार आहे, असे असले तरी बहुजन समाज पक्ष आणि एएमआयएम पक्षानेही निवडणूकीसाठी कंबर कसलेली दिसून येत आहे. यामुळे येथे बहुरंगी लढती पाहिला मिळणार आहेत.
आपची प्रचारात आघाडी
सत्ताधारी पक्ष आपने डिसेंबर महिन्यातच सर्वच्या सर्व 70 जागांवर आपले उमेदवार घोषीत करुन एक प्रकारे प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. आपने आपल्या प्रचाराचीही सर्वांत प्रथम सुरुवात केली असून विविध योजनांची घोषणा केली आहे. दिल्लीतील महिलांना देण्यात येत असलेल्या प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांमध्ये वाढ करुन सत्ता आल्यास 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच दिल्लीतील सर्व मंदिरातील पुजार्‍यांना आणि शिख धर्मातील ग्रंथीना प्रत्येेक महिन्याला 18 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यावरुन दिल्लीत मोठा गोंधळही पाहिला मिळाला आहे. याच बरोबर दिल्लीतील वासींयाना 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही दिले आहे.
काँग्रेसही मैदानात –
लोकसभा निवडणूकीत दिल्लीत झालेल्या पराभावानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे आणि पक्षाचे नेतेही प्रचाराच्या कामाला लागले आहेत.
भाजपचे विजयी आभियानाचे लक्ष्य
केंद्रात सत्तेत असलेलया भाजपनेही यावेळी दिल्ली विधानसभा निवडणूकीत भगवा ध्वज फे डकविण्याचे लक्ष्य ठेवले असून मागील 27 वर्षापासून भाजप दिल्ली विधानसभेतून बाहेर आहे. परंतु मागील वेळी आपच्या अभियानातही 7 जागा भाजपने जिंकल्या होत्या त्यामुळे यावेळी विजयी अभियान राबविण्यांचे भाजपने ठरविले आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button