आरोग्य

परत एकदा चीनी विषाणूूपासून धोका

बीड- कोरोना संकटाचा सामना संपला तरी धोका कायम होता त्यातच आता चीनमधून परत एक नवीन विषाणू अर्थात व्हायरस पसरत असून यात लहान मुलांना व वृध्दांना मोठा धोका संभवतो आहे परंतु भारतात याची साथ अजून पसरली नाही तरी नागरीकांनी काळजी घ्यावी, सावधगिरी बाळगावी आणि समाजीक नियमांचे पालन करावे असे आवाहन सरकारने केले आहे.


चीनमधून पसरलेला नवीन विषाणू मानवी मेटान्यूमो व्हायरस अर्थात र्कीारप चशींरपिर्र्शीोींर्ळीीी (कझचत) हा एक संसर्गजन्य रोग असून तो एकापासून दुसर्‍याकडे पसरतो आहे. भारतात याची अजूनपर्यंत साथ पसरलेली नाही.
चीनमधून नव्याने पसरत असलेला एचपीएमव्ही हा विषाणू साधरणपणे लहान व वृध्दांमध्ये पसरत आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड अर्थात हॉलंडमध्ये 2001 मध्ये आढळून आला आहे. हा विषाणू श्वसनमार्गाशी संबंधीत भागात संसर्गास कारणीभूत ठरतो आहे. सर्दी, खोकला हे यासाठी कारणीभूत ठरत आहे.


सोमवारी केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने या विषाणू बाबतची माहिती दिली असून यात सांगण्यात आले की पूर्वीपासून हा आजार भारतासह जगभरामध्ये आढळून आलेला आहे. सोमवारी समोर आलेल्या माहितीनुसार बेंगळूरमधील बॅप्टिस्ट हॉस्पिटमध्ये एका तीन महिन्याच्या मुलीला आणि आठ महिन्याच्या मुलाला ही लक्षणे असल्याचे आढळून आले आहे. यातील मुलीला डिस्चार्ज देण्यात आला आहे परंतु मुलावर अजून उपचार सुुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.


चीनमधून पसरत असलेल्या या नवीन एचपीएमव्ही या विषाणू बाबतची दखल महाराष्ट्र आरोग्य सेवा संचालनाने घेतली असून त्यांनी 3 जानेवरी 2025 ला राज्यातील सर्व संबंधीत जिल्हापरिषद आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच त्यांनी नागरीकांना कोणती काळजी घ्यायची याचीही माहिती दिली आहे.


महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागरीकांनी पुढील काळजी घेणे गरजेचे आहे. यात – आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. तसेच साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारीत सॅनिटायझरने आपले हात वारंवार धूवा.
ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून लांब रहा आणि भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेटीलेशन) होईल याची दक्षता घ्यावी.


याच बरोबर सर्वांनी काळजी घेण्यासाठी पुढील गोष्टींना टाळावे जसे की हस्तांदोलन करणे टाळावे, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुर्नवापर टाळावे, आजारी लोकांचा जवळचा संपर्क टाळावा, डोळे,नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थूंकणे टाळावे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button