एसकेएच तर्फे घेतलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या आरोग्य तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

(बीड प्रतिनिधी) बीड येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय बीड द्वारा संचालित राष्ट्रीय सेवा योजना विभागासोबत आयुष विभाग, जिल्हा रुग्णालय बीड व पेन्शनर्स अँड सीनियर सिटीजन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पेन्शनर्स दिवसाच्या निमित्ताने भव्य मोफत आरोग्य शिबिर व होमियोपॅथिक रोग निदान शिबिर दि.17 डिसेंबर रोजी येथील भारतीय स्टेट बँक, शाखा राजूरी वेस या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पेन्शनर्स अँड सीनियर सिटीजन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अँड. पी. ए. गोरकर, सचिव व्ही.एस. सर्वज्ञ, डॉ. मीना हंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय स्टेट बँकेच्या वतीने आयोजित या आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिरास सेवानिवृत्त कर्मचार्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या आरोग्य शिबिरात रुग्णांवर अनुभवी व तज्ञ डॉक्टरांनी मोफत तपासणी करून होमिओपॅथीचे औषधोपचार केले. हे शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.यावेळी सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित महात्मा गांधी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ.मीना हंगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी तथा उप प्राचार्य डॉ. गणेश पांगारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरास डॉ .अनिल राठोड डॉ. दिकेश ठिकरे डॉ.दीक्षिता घोरपडे डॉ.सयुक्ता काळे यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. महाविद्यालयाच्या पदव्युत्तर मानसरोग विभागाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयुष विभागाचे आनंदकुमार लिमकर तसेच शितल तुपे, स्नेहल शिंदे, प्रणाली वाघ, ऋतुजा तांबे, दीपक पवार यांनी परिश्रम घेतले
