ताज्या बातम्या

विरोधी पक्षांच्या आमदारांच ईव्हिएमच्या विरोधात विधीमंडळ परिसरात आंदोलन

नागपूर ः विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभावानंतर विरोधी पक्षांनी सतत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हिएम) हटवा आणि मतपत्रिकांवर निवडणूका घेण्याची सतत मागणी करत महाराष्ट्रासह देशभरात आंदोलन सुरु केले असून त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्षांच्या आमदारांनी एकत्र येवून ईव्हिएम विरोधात आंदोलन केले.
महायुतीच सरकार स्थापन झाल्यानंतर सोमवारपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी एकत्र येवून ईव्हिएमच्या विरोधात आंदोलन केले. विधानपरिषद सभागृहातील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे आमदार एकत्र आले आणि त्यांनी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर ईव्हिएम विरोधात आंदोलन केले. यावेळी जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, संजय मेश्राम, सुधाकर अडबाले, नितीन राऊत, भाई जगताप, महेश सावंत, अमित देशमुख, अनिल चौधरी, सतेज पाटिल, अभिजीत वंजारी, विकास ठाकरे, वरुण सरदेसाई, रोहित पाटिल, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते. या सर्वांनी ईव्हिएम हटवा, देश वाचवा अश्या घोषणा दिल्या व ईव्हिएम हटाव लोकशाही बचाव असे बॅनरही त्यांनी हाती घेतले होते.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Back to top button