या वर्षी क्रिकेटमधून अनेक दिग्गजांनी घेतली निवृत्ती
क्रिकेट हा खेळ भारतीयांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि या खेळाशी संबंधीत देशाशी असो वा आंतरराष्ट्रीय बातमी असो सर्वांचे कान लगेच टोकारले जातात आणि यावर तासनं तास चर्चा घडवून येतात. क्रिकेट क्षेत्राशी संबंधीत अशीच एक बातमी समोर आली असून या मावळत्या वर्षाच्या शेवटपर्यंत जगातील अनेक दिग्गजांनी क्रिकेटला अलविदा केले आहे. यातील काहीनी कसोटी, काहींनी एकदिवशीय तर काहींनी टि-20 सामन्यांना आणि काहींनी सर्वच प्रारुपांचा निरोप घेत निवृत्ती स्विकारली आहे.
भारतासह अनेक देशातील दिग्गज खेळाडूनी या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेेतला आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर ही बातमी अनेकांना धक्का देणारी ठरणार आहे.
भारताकडून 38 वर्षीय धडाकेबाज फ लंदाज शिखर धवनने सर्व प्रारुपमधून निवृत्ती घेतली आहे. यष्टीरक्षक व फ लंदाज राहिलेला दिनेश कार्तिक याने वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा केले आहे. वृध्दिमान साहानेही वयाच्या 40 व्या वर्षी सर्व प्रारुपमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
तसेच 34 वर्षी सौरभ तिवारीने ही सर्व प्रारुपमधून निवृत्ती घेतली आहे. 39 वर्षी फ लंदाज केदार जाधवनेही क्रिकेटच्या सर्व प्रारुममधून निवृत्ती पत्करली आहे. बरिंदर सण याने 31 व्या वर्षी सर्व प्रारुपमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
दिग्गज फ लंदाज व माजी कर्णधार विराट कोहलीने 32 व्या वर्षी टि-20 प्रारुपमधून निवृत्ती घेतली. फ लंदाज रोहित शर्माने 32 व्या वर्षी टि-20 मधून निवृत्ती घेतली. रविंद्र जडेजानेही 32 व्या वर्षी टि-20 प्रारुपमधून निवृत्ती घेतली.
या क्षेत्रातून निवृत्ती घेणार्यामध्ये इंग्लंडचा 41 वर्षीय जेम्स अॅडरसन यांने सर्व प्रारुपमधून निवृत्ती घेतली आहे. तर इंग्लंडचाच 37 वर्षीय डेव्हिड मलान याने सर्व प्रारुपमधून निवृत्ती घेतली आहे.
या पाठोपाठ वेस्टइंडिजचा 36 वर्षीय शॅनॉन गेब्रियल यांनेही सर्व प्रारुपमधून निवृत्ती पत्करली आहे. ऑस्ट्रेलियाचा 37 वर्षीय डेव्हिड वॉर्नर यानेही क्रिकेटच्या प्रारुपाला रामराम ठोकला आहे.
नाम्बिया सारख्या नवख्या संघासाठी खेळणार्या 39 वर्षीय डेव्हिड व्हिजा यांनेही क्रिके्रटमधील सर्व प्रारुपमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. न्यूझिलँड संघाचा वेगवान गोलंदाज असलेला 37 वर्षीय नील वँगनर यांनेही सर्व प्रारुपमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले.
दक्षिण अफ्रि केचा 36 वर्षीय फ लंदाज डिएन एल्गर यानेही क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फ लंंदाज मॅथ्यू वेड यांने 36 व्या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
न्यूझीलँड संघातील 37 वर्षीय फ लंदाज कॉलिन मुन्रोने सर्व प्रारुपमधून निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा 26 वर्षीय फ लंदाज विल पुकोवस्की यांनेही सर्व प्रारुपमधून क्रिकेटला अलविदा केले आहे. इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाज मोईन अलीने 37 व्या वर्षी सर्व प्रारुपमधून निवृत्तीची घोषणा केली.
बांगलादेशाचा 37 वर्षीय शाकिब अल हसन यांने मात्र कसोटी आणि टि-20 प्रारुपमधून निवृत्ती घेतली आहे. दक्षिण आफ्रि केचा हेनरिक क्लासेन यांने32 व्या वर्षी सर्व प्रारुपमधून निवृत्ती घेतली आहे. बांगलादेशाचा 38 वर्षीय महमदुल्लाह याने टि-20 प्रारुपमधून निवृत्ती घेतली आहे.