हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार – फ डणवीस

मुंबई – राज्यात गुरुवारी महायुतीच नवीन सरकार स्थापन झाल असून सुरुवातीला मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे परंतु संपूर्ण मंत्रिमंडळ अजून स्थापन व्हायच आहे आणि ते हिवाळी अधिवेशनाच्या आधी पूर्ण होईल अशी माहिती राज्याचे नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी दिली.
गुरुवारी आझद मैदानावर राज्याचे नुतन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फ डणवीस आणि एकनाथ शिंदे व अजीत पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या छोटयाश्या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रिय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.
नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांंशी संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. यासाठी तीनीही पक्षांच्या प्रमुखांची जवळपास बोलणी पूर्ण झाली आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर खातेवाटपही जाहिर होईल. राज्यात मतमोजणी 23 नोव्हेंबरला झाली होती आणि तब्बल 13 दिवसानंतर सरकार स्थापन झाले आहे.