बीड शहरात टिप्परने दिलेल्या धडकेत महिला जखमी
बीड- बीड शहरात सध्या नगररोडचे बांधकाम सुरु असून या रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहने जीवमुठीत घेवू चालवावी लागत आहेत. गुरुवारी सकाळी एक महिला आपल्या स्कुटीवरुन जात असतानाच एका टिप्परने तिला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली आहे व तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
बीड शहरातील बीड -अहमदनगर रोडचे बांधकाम सध्या युध्द पातळीवर सुरु असून काही ठिकाणी हे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणी ते सुरु आहे. रस्त्याच्या काही भागात कच्चा रस्ता ठेवण्यात आला आहे परंतु हा कच्चा रस्ता लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. बीड शहरातील ऑफिसर कॉलनी जवळ कच्चा रस्ता असून तो अत्यंत धोकादायक ठरत आहे. या रस्त्याच्या मधोमत रोडा टाकून दिला आहे आणि काही ठिकाणी तो उंच झाला तर काही ठिकाणी खोल झाला आहे. तो समतोल नसल्याने वाहने घसरत आहेत आणि अपघात होत आहे.
गुरुवारी सकाळी एक महिला आपली स्कुटी एमएच 23 बीके 3391 वरुन सकाळी 9.30 च्या सुमारास जात असताना तिच्या स्कुटीला टिप्पर क्रमांक एमएच 23 डब्ल्यू 7111 ने धडक दिली. या अपघातामध्ये महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. टिप्परच्या धडकेमुळे स्कुटिचे मोठे नुकसान झाले आहे.