बीडचे सुपुत्र दिगंबर कुंडलकर यांना राष्ट्रीय स्तरावरील सहकारी ॓संस्था रत्न ॔ पुरस्कार प्रदान

बीड ः दि. 15. – मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीने बीड शहरातील सहकार क्षेत्रातील प्रमाणित लेखा परीक्षक दिगंबर कुंडलकर यांना सहकार क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील सहकार संस्था रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना देण्यात येणारा सहकारी संस्था रत्न या पुरस्कारासाठी देशभरातून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात येते. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा अभिमान राष्ट्रीय पुरस्कारथीं व बीड शहरातील सहकार क्षेत्रातील नामवंत असलेले प्रामाणित लेखापरीक्षक दिगंबर कुंडलकर यांची निवड करण्यात आली. तेलंगणा राज्यातील हैदराबाद मधील रामकोटी येथे झालेल्या समारंभामध्ये दिगंबर कुंडलकर यांना 30 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रस्तरीय सहकार संस्था रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्या पुरस्काराथींची निवड करण्यात आली त्यासाठी पुरस्कारथींची त्यांनी केलेल्या कामाच्या कागदपत्रांची छाननी तसेच प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड करण्यात आली.
या आधी दिगंबर कुंडलकर यांना राज्यस्तरीय गुणिजन गौरव आदर्श सहकारी संस्था सेवा रत्न पुरस्कार मिळाला होता. सहकार क्षेत्रातील अत्यंत अभ्यासू असे व्यक्तिमत्त्व असलेले दिगंबर कुंडलकर यांना आध्यात्मिक क्षेत्राचा सुद्धा वारसा मिळालेला आहे वडिलोपार्जित या वारसाचा त्यांनी समाज प्रबोधासाठी उपयोग केला आहे तसेच त्यांनी हार्मोनियम आणि गायनाचा व्यासंग जपला आहे. तसेच सहकारी पतसंस्थांमध्ये कामाचा दीर्घकाळ असा अनुभव सुद्धा त्यांना आहे. दिगंबर कुंडलकर यांना राष्ट्रीयस्तरावरील सहकारी संस्था रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे पूर्णवाद परिवार गुरुबंधू, श्री विश्वकर्मा संघ, सहकार क्षेत्रातील त्यांचे मित्रपरिवार नातेवाईक आप्तेष्ट इत्यादींनी त्यांचे कौतुक व अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.




