भगवान गडावरील दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा – शंकर देशमुख

बीड: महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले आहे.
भगवान भक्ती गडावर होणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्या पारंपारिक दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा पासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत चालू असलेल्या सेवा पंधरवड्याच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या वर्चुअल बैठकीत जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख हे बोलत होते. या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषदेचे सदस्य एड. सर्जेराव तांदळे देविदास नागरगोजे, सलीम जहांगीर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे जिल्हा सरचिटणीस रामदास बडे ,मीराताई गांधले,गणेश कराड , गणेश लांडे यांचे सह जिल्ह्यातील सर्व मंडल प्रमुख व कार्यकर्ते पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकी प्रसंगी सेवा पंधरवड्याच्या कार्यक्रमाचा आढावा घेऊन दसरा मेळाव्याच्या यशस्वी नियोजना संदर्भात तयारी करण्यात आली असून या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रवक्ते राम कुलकर्णी , राज्य परिषदेचे सदस्य सर्जेराव तांदळे , जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे , भाजपाचे ज्येष्ठ नेते देविदास नागरगोजे, पि टी चव्हाण या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मेळावा यशस्वी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीत पुढे मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला दसरा मेळावा पंकजाताई मुंडे यशस्वीपणे पुढे चालवत असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात दसरा मेळावा होणार असून राज्यभरातील भगवान बाबा वर प्रेम असणारे व मुंडे प्रेमी या दुसरा मेळाव्यास उपस्थित राहणार आहे तरी हा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले आहे.बैठकीचे संचलन भाजपचे जिल्हा सचिव शांतीनाथ डोरले यांनी केले