आरोग्य

सप्त चक्र ःशरीरातील ऊर्जा केंद्र

मानवी शरीरात सात चक्र असून ते आध्यात्मिक व शारिरीक ऊर्जेचे हे महत्वपूर्ण केंद्र असते. हे सात चक्र पाठिच्या कण्याच्या खालच्या बाजून पासून वरच्या भागापर्यंत वेगवेगळ्या स्थानावर असतात. या सात चक्रातील प्रत्येक चक्र हे एक विशिष्ट ऊर्जा आवृत्ती आणि बीजमंत्री जोडलेले आहे.
प्राचीन भारतीय योग परंपरामध्ये या चक्रांना संतुतिल करण्यासाठी बीज मंत्रांचे उच्चारण केले जाते. प्रत्येक बीजमंत्र हे एक विशेष ध्वनी तरंग निर्माण करतो. जे संबंधीत चक्राला सक्रिय आणि शुध्द करतो आहे. यामुळे व्यक्तींचा संपूर्ण आरोग्य आणि आध्यात्मिक विकास शक्यत होतो.

विशेष सूचना – सप्त चक्रातील बीजमंत्र हे योगगुरुच्या मार्गदर्शनाखालीच शिकावे आणि त्याचे उच्चारणही योग्यरित्या व्हावे. असे न झाल्यास योगाचा उलटा परिणामही होऊ शकतो आणि मानसिक, शारिरीक व बौध्दीक इजा होण्याची शक्यताही असते असे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

मूळाधार चक्र ः
बीज मंत्र लं आणि तत्व पृथ्वी ः
मूलाधार चक्र हे पाठीच्या कणाच्या खालील भागात असते आणि हे लाल रंगाचे आहे व ते आपल्या अस्तित्व, सुरक्षा आणि स्थिरताशी संबंधीत असते. लं हे याचा मूळ मंत्र आहे आणि याचा उच्चार लम् सारखा केला जातो.
पृथ्वीचे तत्व – स्थिरता आणि ठोसला प्रदान करते.
लं बीज मंत्र – आधार ऊर्जाला जागृत करतो.
मुख्य कार्य – सुरक्षा, स्थिरता आणि अस्तित्वाची भावना निर्माण करतो.
हे चक्र असंतुलित झाल्यास भिती, अनिश्चिता आणि अस्थिरताची भावना निर्माण होते. नियमीतपणे लं मंत्राचा जप केल्यास मूळधार चक्र संतुलित होतो आणि व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षेची भावना वाढते.
स्वाधिष्ठान चक्र ः
वं बीज मंत्र आणि जलतत्वाची शक्ती- स्वाधिष्ठान चक्र हे नाभीच्या खालच्या बाजूला पोटाच्या खालच्या बाजूला असते. हे नारंगी रंगाचे असून जे रचनात्मकता, भावना आणि यौन ऊर्जेशी संबंधीत आहे. वं हा त्याचा बीजमंत्र आहे आणि याचा उच्चार वम् सारखा केला जातो.
जलतत्व – प्रवाह आणि लवचिकता प्रदान करतो
वं बीज मंत्र – रचनात्मक ऊर्जेला प्रवाहित करतो.
संतुलीत लाभ – भावनात्मक स्थिरता आणि रचनात्मक अभिव्यक्ती.

हे चक्र असंतुलित झाल्यास भावनात्मक अस्थिरता, रचनात्मक अडथळा आणि यौन समस्या निर्माण होवू शकते. वं मंत्राचा अभ्यास केल्यास स्वाधिष्ठान चक्र शुध्द होते ज्यामुळे भावनाचा स्वस्थ्य प्रवाह आणि रचनात्मक ऊर्जेचा विकास होतो.
मणिपूर चक्र –
रं बीजमंत्र आणि अग्नि तत्वाचा
प्रभाव – मणिपूर चक्र सौर जाळ्यात नाभीच्या वर आहे आणि याचा रंग पिवळा आहे. जे आत्मसन्मान, इच्छाशक्ती आणि शक्तीशी संबंधीत आहे. रं हा त्याचा बीजमंत्र आहे आणि याचा उच्चार रम् सारखा केला जातो.
अग्नितत्व – रूपांतरण आणि शक्ती प्रदान करतो.
रं बीजमंत्र – अंतर्गत शक्तीला जागृत करतो.
मुख्यगुण – आत्मविश्वास आणि दृढ संकल्प
आध्यात्मिक प्रभाव – अहंकाराचे रुपांतर आणि आत्मा अनुशासन.
हे चक्र असंतुलित झाल्यास आत्मसन्मानाची कमी, अनिर्णय आणि शक्ती संघर्षाची शक्तीची समस्या निर्माण होवू शकते. रं मंत्राचा नियमित जप केल्यास मणिपूर चक्र हे शुध्द होते आणि यामुळे आत्मविश्वास, साहस आणि जीवनात संतुलित शक्तीचा अनुभव होतो.
अनाहत चक्र – यं बीजमंत्र आणि वायू तत्वाचा संबंध
अनाहत चक्र हे हृदयात असून हे हिरव्या रंगाचे आहे जे प्रेम, करुणा आणि संबंधाशी जोडलेले आहे. यं हा याचा बीजमंत्र आणि आणि याचा उच्चार यम् सारखा केला जातो.
वायू तत्व – हवे सारखेच प्रेमाला पसरवितो आणि शक्यतांना जन्म देतो. या तत्वात आपल्या दुसर्‍याशी जोडण्याचे आणि व्यापकपणे प्रेमाची जाणिव करण्याला मदत करतो.
यं बीजमंत्र – खोल हृदयातून हा मंत्रा म्हटला जातो जो प्रेमाच्या ऊर्जेला जागृत करतो आहे. याचा जप केल्याने आपल्या स्वतःला आणि दुसर्‍यांच्या प्रति प्रेम आणि करुणा विकसीत करु शकतो.
हे चक्र असंतुलित झाल्यास ईर्ष्या, आसक्ती आणि नात्यामध्ये अस्थिरता निर्माण होवू शकते. या मंत्राचा नियमितपणे जप केल्यास हृदय प्रसन्न राहते व्यक्ती खर्‍या प्रेमाची आणि सहानुभूतीचा अनुभव करु लागतो.
विशुध्द चक्र –
हं बीजमंत्र आणि आकाश तत्वाची अभिव्यक्ती –
विशुध्द चक्र कंठात असतो आणि या चक्राचा रंग निळा आहे. जो अभिव्यक्ती, संचार आणि सत्याशी जोडलेला असतो.हं याचा बीजमंत्र आहे आणि याचा उच्चार हम् सारखा केला जातो.
आकाश तत्वाचा अनुभव – आकाशा सारख्या अनंत शक्यता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनुभव करावा. हे तत्व आपल्याला विस्तार आणि अनंत शक्यतांशी जोडतो आहे.
हं बीजमंत्राचा अभ्यास – दिर्घ श्वास घेवून कंठभागावर लक्ष केंद्रित करत हं मंत्राचा उच्चार करावा. यामुळे कंठ मोकळा होतो आणि अभिव्यक्ती शुध्द होते.
खर्‍या अभिव्यक्तीची प्राप्ती – संतुलित विशुध्द चक्रामुळे प्रामाणिक अभिव्यक्ती, स्पष्ट संचार आणि सत्य बोलण्याची क्षमता विकसीत होते. हे तुमच्या विचारांना प्रभावीपणे व्यक्त करण्यात मदत करतो.
हे चक्र असंतुलित झाल्यास संचारामध्ये अडथळा, आपले विचार व्यक्त करण्यात अडचणी आणि गळ्याशी संबंधीत समस्या निर्माण होवू शकतात. हं मंत्राचा अभ्यास ळज्ञकेल्यास विशुध्द चक्र शुध्द होतो आणि व्यक्ती आपले विचार आणि भावनाना स्पष्टपणे व्यक्त करु शकतो
आज्ञा चक्र – ओम बीजमंत्र आणि तिसर्‍या नेत्राची जागृती –

हे आज्ञा चक्र दोन भुवयांच्यामध्ये आणि कपाळ्याच्या मध्यभागी असते, याला तिसरा नेत्र असतेही म्हणतात. हे चक्र निळा-जांभळा रंगाचे आहे जे अंतर्ज्ञान, ज्ञान आणि आत्मजागरुकताशी संबंधीत आहे. ओम हे बीजमंत्र आहे.
अंतर्ज्ञानाची जागृती – आज्ञा चक्र अंतर्ज्ञान आणि अंतदृष्टीचे केंद्र असून हे जागृत झाल्यावर व्यक्ती सूक्ष्म संकेताना समजने आणि आपल्या अंतदृष्टिवर विश्वास करु लागतो.

ओम बीजमंत्र शक्ती –
ओम् हे सर्व ध्वनींचे मूळ आहे आणि ब्राम्हांडीय ऊर्जेचे प्रतिक आहे. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि अंतर्गत प्रकाश प्रज्वली होतो.
तिसर्‍या नेत्राची जागृती –
आज्ञा चक्रा संतुलित झाल्यास तिसरे नेत्र उघडते, ज्यामुळे व्यक्ती भौतिक जगाच्या पलिकडे पाहू शकतो आणि उच्च चेतानाशी जोडू शकतो.
मनाचे संतुलन – या चक्राच्या माध्यमातून तार्किक आणि रचनात्मक बाजूंचे संतुलन होते ज्यामुळे समग्र दृष्टिकोन विकसीत होतो आणि भ्रम दूर होतो.
हे चक्र असंतुलित झाल्यास भ्रम, असमंजस्य आणि अस्पष्ट विचारांची समस्या होवू शकते. ओम् मंत्राचा नियमित जप केल्याने आज्ञा चक्र शुध्द होतो आणि व्यक्ती स्पष्ट अंतदृष्टि आणि आत्मा जागरुकता प्राप्त करतो.
सहस्त्रार चक्र –
परम चेतनाशी संबंधीत आणि सर्व बीजमंत्राचा समन्वय –
सहस्त्रार चक्र हे माथा (डोक्या) च्या मध्यभागी असते. हे जांभळ्या किंवा पांढर्‍या रंगाचे चक्र आहे जे आध्यात्मिक जागृती, परम चेतना आणि दिव्य ज्ञानाशी जोडलेले आहे. सर्व बीजमंत्राचा समन्वय या चक्रात असते. परंतु मौन ध्यान यासाठी उपयुक्त साधना आहे.
सखोल ध्यानाचा आभ्यास –सहस्त्रार चक्राला जागृत करण्यासाठी सखोल ध्यान आणि मौनाच्या अवस्थेत जाणे आवश्यक आहे. हे सर्व चक्रांच्या ऊर्जेला वरच्या बाजूला आकर्षित करते.
सर्व बीजमंत्रांचा समन्वय – सर्व चक्रांमध्ये बीजमंत्रांचा क्रमिकपणे जप करुन लं, वं, रं, यं, हं आणि शेवटी मौन ध्यान सहस्त्रार चक्राला जागृत करण्यात सहाय्यक होतो.
परम चेतनेचा अनुभव – सहस्त्रार जागृत झाल्यावर व्यक्ती परम सत्य, आनंद आणि शांतीचा अनुभव करतो आहे. ही अवस्था सर्व द्वंद्वाच्या पलिकडे आहे आणि परम एकतेचा बोध करतो.
सहस्त्रदल कमलाचा विकास – हे चक्र हजारो पंख असलेल्या कमलाच्या रुपात चित्रीत केला जाते, जे परिपूर्णता आणि ब्रह्मांडीय चेतनेचे प्रतिक आहे. याचे फु लण्याने साधकाला मोक्षाची अनुभूती होते.
या चक्राच्या असंतुलनामुळे आध्यात्मिक उदासीनता, जीवनाच्या उद्देश्यांची कमी आणि संपूर्णतेचा आभवांचा अनुभव होवू शकतो. नियमित ध्यान आणि सर्व चक्रांचे संतुलनामुळे सहस्त्रार चक्र जागृत होते ज्यामुळे परम चेतना आणि आत्म साक्षात्काराचा अनुभव होतो.
शरीरातील हे सात चक्र हे मनुष्यातील सर्व गुण दोषांसाठी परिणामकारक आहेत. त्यामुळे मनुष्यातील बदलही त्याचा परिणामकारक पध्दतीने दिसून येतो. या सर्वांसाठी हे सप्त चक्र व त्यांचा व्यवहार हा मानवी जीवनातील एक महत्वाचा घटक आहे आणि तो अनुभवलाही मिळतो.

माहिती संकलन
डॉ.महेंद्र गौशाल
प्राचार्य – एसकेएच कॉलेज,बीड.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button