पं.हृषिकेश महाले यांच्या मास्टर क्लासला पुण्यात गायक-गायिकांचा उर्त्स्फू त प्रतिसाद

नवोदीत गायकांनी गिरविले संगीताचे धडे व जाणल्या रियाजाच्या नवनवीन पध्दती
पुणे (प्रतिनिधी) – गजल मास्ट्रो हृषिकेश महाले यांनी पुण्यातील नवोदित गायकांसाठी आयोजीत केलेल्या मास्टर क्लासला मोठा उर्त्स्फू त प्रतिसाद मिळाला असून नवोदित कलाकारांनी या क्लासमध्ये गाण्यातील विविध बारकावे शिकले असून मोठ्या संख्येने नवोदित गायकांनी या मास्टर क्लासचा अनुभव घेतला.
पुण्यातील गजल मास्ट्रो हृषिकेश महाले यांचा मास्टर क्लास यशस्वीरित्या हाऊसफुल पार पडला. नवोदित गायक आणि गायकांनी या मास्टर क्लासला उदंड प्रतिसाद दिला.

सुरुवातीस गेल्या 46 वर्षांच्या आपल्या गायन कारकिर्दीचा आढावा घेत नवोदित गायकांना उपयोगी पडतील अशा अनेक महत्त्वपूर्ण टिप्स पंडितजीनी साध्या सोप्या भाषेत दिल्या .
ओमकार, प्राणायामाचे महत्त्व साांगून नव्या दृष्टीकोनातून व नव्या पद्धतीने आजच्या पिढीला रुचेल व पटेल अशा पद्धतीने रियाजाच्या पद्धतींचे त्यानी विश्लेषण केले.
पं.हृषिकेश महाले यांचे गुरु पद्मभूषण जगजीत सिंग यांची होठो से छू लो तुम ही गजल अनोख्या शैलीमध्ये कशी गाता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित गायक गायिकांकडूनही गाऊन घेतली. यामध्ये भावात्मक स्वरालाप, दीर्घ श्वसनाचे महत्व पटवून देणार्या आलापाचा समावेश होतो.
ब्रह्मनाद अर्थात तानपुरा या विषयीची खूप उपयोगी माहिती त्याच्या बारकाव्यासहित त्यांनी सांगितली. तसेच कोणतंही गायन करताना सर्वात आधी स्केल अर्थात पट्टी कशी निश्चित करावी हे अनेक शास्त्रीय/उपशास्त्रीय उदाहरणांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर एखादे गाणे कसे बसवावे, कशा पध्दतीने अभ्यासावे, स्वराभ्यास करताना येणार्या अडचणींना कसे तोंड द्यावे इत्यादी गोष्टींही या मास्टर क्लासमध्ये विशेष करुन घेतल्या गेल्या.
गजलचा उगम कसा झाला, कुठून झाला तसेच आपल्या भारतामध्ये गजल कशी रुजली याचा संक्षिप्त इतिहास अनेक बारकाव्यांसहित पंडितजींनी सांगितला.

स्वर,भाव शब्दांचा कोणत्याही गायन प्रकाराशी कसा संबंध आहे व तो कसा अभ्यासावा तसंच नक्की रियाज कसा आणि कोणता करायचा याचेही मार्गदर्शन करण्यात आले. तोडी रागाचे विविध प्रकार, स्वर विस्तार व इतिहास याचे विशेष प्रात्यक्षिक शिकणार्यांना खूप भावले.
रंगमंचावर गायन प्रस्तुती करण्यासाठी कशी तयारी करावी याचेही सखोल मार्गदर्शन उपस्थितांना मिळाले. सहभागी गायक आणि गायिकांनी प्रश्नोत्तराच्या राउंडमध्ये अभ्यासू वृत्तीने अनेक सर्वोपयोगी प्रश्न विचारले.
या मास्टर क्लासमध्ये संगीता पाटील, आदित्य साने, डॉ.उन्नती निंबाळकर, मोहन जकाते, राजेंद्र महामुनी, सायली देशमुख, सुनीता बेडेकर, स्वरश्री आणि कल्पेश मोघे यांनी सहभाग घेतला होता. प्रथमेश थोरात यांनी गिटारवर उत्तम साथसंगत केली. या मास्टर क्लासला पं.हृषिकेश महाले यांच्या पत्नी व गायिका पूर्वा महाले यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते प्रथमेश थोरात यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व सहभागी गायक व गायिकांच्या वतीने गायिका स्वरश्री कुलकर्णी यांनी पंडितजींचा सत्कार केला व आभार मानले.
