अनंत अंबानीची जामनगर ते द्वारका पायीयात्रा

गांधीनगर – भारतातील सर्वांत श्रीमंत घराण्यांंपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबातील अनंत अंबानीने आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जामनगर ते द्वारकामधील द्वारकाधीश मंदिरा पर्यंत पायीयात्रा सुरु केली असून ही यात्रा 9 एप्रिलला पूर्ण होणार आहे.

आपल्या शाही विवाहामुळे सतत चर्चेत राहिलेला अनंत अंबानी याने 9 एप्रिला आपल्या जन्मदिवसाचे औचित्यसाधून आपले राहते गांव गुजरातमधील जमानगर ते कृष्णाचे प्रसिध्द ठिकाण द्वारकापर्यंत पायीयात्रा सुरु केली आहे. त्याच्या बरोबर अनेक जण पायी चालत असून तो दररोज 12 ते 15 किलोमीटर चालतो आहे.
अनंत अंबानी आपल्या पदयात्रेत अनेक ठिकाणी मुक्कामही करतो आहे आणि ठिक ठिकाणी असलेल्या देवालयात जावून दर्शन करतो. रात्रीच्यावेळी भजन, किर्तनात सहभागी होत आहे.

अनंत अंबानी लहानपणापासूनच अस्थमा व फ ाइब्रोसिस या रोगाने ग्रस्त आहे तरीही त्याची भक्ती ही कमी झालेली नाही आणि आपल्या आरोग्याची परवाह न करताही तो ही यात्रा करत आहे. आपल्या 30 व्या जन्मदिनी तो द्वारकामध्ये जावून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेणार आहे व आपल्या यात्रेची समाप्ती करणार आहे.
कोंबड्यांना दिले जीवदान – अनंत अंबानी हा प्राण्यांवर दया करणार्या वृत्तीचा असून आपल्या यात्रे दरम्यान रस्त्यावरुन कोंबड्याने भरलेला एक ट्रक जाताना पाहताच त्याने त्याला थांबवले आणि त्याला दुप्पट किंमत देवून या कोंबड्यांना सोडविले व त्यांच्या देखभाल करण्याचे त्याने निर्देशही दिले आहेत.
आपल्या विवाहाने चर्चेत राहिलेला अनंत – अनंत अंबानीने मागील वर्षी आपली बालपणाची मैत्रीण राधीका मर्चंट हिच्याशी विवाह केला असून तो विवाह भारतातील सर्वांत श्रीमंत विवाहांपैकी एक होता व यामुळे अनंत सतत चर्चेत राहिला आहे.
