मराठी कला विश्व ः अभिनेत्री अदिती द्रविडचा साखरपुडा

कलर्स मराठी मनोरंजन वाहिणीवरील गाजलेली मालिका सुंदरा मनामध्ये भरलीमधील सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका करणारी अदिती द्रविड हिने गुडी पाडावाचा शुभ मुर्हुत साधत आपल्या होणार्या भावि पती बरोबर साखरपुडा केला असून त्याचे फ ोटो तिने सोशल मिडीयावर प्रसिध्दही केले आहेत.

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी यावर्षी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय केला असून ऐककाळी कलर्स मराठी या मनोरंज वाहिणीवर गाजलेली मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली. या मालिकेत सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसून आलेली अदिती द्रविड हिने आता आपल विवाहित जीवन सुरु करण्याचा निर्णय केला असून गुडी पाडवा या साडेतीन मुर्हुतापैकी एक असलेल्या शुभ मुर्हुतावर आपला भावी पती मोहित लिमयेशी तिने साखरपुडा केला आहे.
अभिनेत्री, निवेदीका, गीतकार व नृत्यांगना आशा वेगवेगळ्या भूमिकेत सतत चर्चेत राहिलेली अदिती हीने सोशाल मिडीयावर आपल्या साखरपुड्याचे फ ोटो प्रसिध्द केले आहेत आणि सर्व चाहत्यांना सुखाचा धक्का दिला आहे. अदितीने सोशल मिडियावर जे फ ोटो प्रसिध्द केले आहेत त्यात तिने आपल्या व आपल्या होणार्या पतीच्या बोटोत घातलेल्या अंगठीचा फ ोटो प्रसिध्द केला आहे. याच बरोबर कार्यक्रमातील अनेक फ ोटो तिने प्रसिध्द केले आहेत.

या जोडीने सुंदर असे फ ोटो शूट केले असून तिने ते सोशल मिडीयावर टाकून आपण विवाह बंधनात अडकत असल्याचे सांगितले आहे.

