म्यानमारमधील भूकंपात एक हजार जणांचा मृत्यू

यागूंन – भारताच्या शेजारील देश म्यानमार पूर्वीचा ब्रह्मदेशात शनिवारी आलेल्या 7.7 रिअक्टर स्केलवरील भूकंपामध्ये एक हजार जणांचा मृत्यू झाला तर हजारो लोक हे जखमी झाले आहेत. म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाचा सर्वांत मोठा फ टका थायलँडयाला बसला असला असून राजधानी बॅकाँकमधील अनेक इमारती कोलमडून पडल्या आहेत.
म्यानमारमध्ये आलेला 7.7 रिअरक्टर स्केलचा भूकंपाचा केंद्र बिंदू हा म्यानमारमध्येच असून तो पृथ्वीपासून 10 किलोमीटर खोलवर आहे. तर याचे धक्के शेजारच्या थायलँडला बसले असून भूकंपा संबंधीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर दिसत आहेत व त्यानुसार एक बांधकाम सुरु असलेली इमारत पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळताना दिसत आहे आणि या खाली 40 पेक्षा अधिक मजूर गाडले गेल्याचे सांगण्यात येते.
थायलँडमधील बँकॉक सर्वाधिक 1 कोटी 70 लोकसंख्या असलेल्या या शहरात भूकंपाचे झटक्के जाणवू लागताच सर्वत्र सायरनचा आवाज सुरुवात झाली आणि नागरीकांना सूचना दिली गेली.
या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान व जीवीत हानी ही म्यानमारमध्ये झाली असून जगभरात त्यांना मदतीचा हात पुढे केला जात आहे आणि यात सर्वाधिक प्रथम पुढे आला तो भारत.
भारता आला मदतीसाठी धावून
म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाची व जीवीत हानीची माहिती मिळताच भारताने मदतीचा हात पुढे केला असून भारतातून औषधे, पाणी, तंबू, जीवनाश्यक वस्तूंना घेवून पहिले ग्लोबलमास्टर विमान हे राजधानी यांगूनला पोहचले असून ही सर्व मदत भारतीय राजदूत अभय ठाकूर यांनी स्थानिक सरकारकडे दिली आहे. भारताने म्यानमारला मदत देण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा ही मोहिम सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्यानमारचे सैन्य शासक जनरल एचई मिन आँग ह्याइंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला असून त्यांना सांगितले की एक जवळचा मित्र आणि शेजारी असल्याच्या नात्याने भारत या संकटकाळी म्यानमारमधील लोकांच्या बरोबरीने उभा आहे.