विज्ञान-तंत्रज्ञान

अखेर सुनिता विल्यमस् पृथ्वीवर परतली

कॅलीफ ोर्निया – आठ दिवसासाठी अवकाशात गेलेली सुनिता विल्यमस् तब्बल 286 दिवस वर अडकून पडली आणि अखेर 18 मार्चला ती एका खास अवकाशा यानाने पृथ्वीवर परतली असल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला असून आता तिला पुढील काही दिवस पुनर्वास केंद्रात रहावे लागणार आहे.
मागील वर्षी जून 2024 मध्ये स्पेसक्सच्या यानातून नासाची अवकाशयात्री सुनिता विल्यमस् आठ दिवसाच्या अवकाशयात्रेसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर गेली होती परंतु परत येण्या अगोदरच तिच्या अवकाशयानात तांत्रिक बिघाड झाल्याने तिला व तिच्या सहकार्याना पृथ्वीवर परत येता आले नाही. त्यानंतर ती सलग नऊ महिने अवकाशातच या केंद्रात मुक्कामाला होती आणि ती पृथ्वीवर कधी परत येणार हे अनिश्चित होते.
नासाने व खाजगी कंपनी स्पेसएक्सने मात्र तिला पृथ्वीवर परत आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली होती आणि अखेर दोन दिवसापूर्वी स्पेसएक्सचीे ड्रॅगन हे कॅप्सुल आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राला जोडले गेले आणि त्यानंतर सुनिता विलिमस् व तिच्या सहकार्याचा परतीचा प्रवास सुरु झाला.


सर्वकाही ठिक असल्याचा संदेश मिळाल्यानंतर भारतीय प्रमाण वेळे नुसार सुनिता विलिमस् तिचे सहकारी व क्रू -9 चे कमांडर निक हेग, बुच विलमोर आणि अ‍ॅलेक हे चारही यात्री मंगळवारी पृथ्वीकडे येण्यासाठी निघाले आणि भारतीय प्रमाणवेळ बुधवारी पहाटे 3 वाजून 27 मिनिटाने समुद्रात त्यांचे अवकाश यात्र सुखरुपपणे उतरले.
अवकाशयात्रीना घेवून परतलेले अवकाश यान समुद्रात उतरताच त्याच्या अवतीभोवती अमेरीकन नौदालाचे जहाजने उभी होती व त्यांनी ताबडतोब या यानाच्या जवळ जावून याला जहाजावर आणले आणि त्यानंतर यानाचा दरवाजा उघडून एक एक करुन सर्व अवकाशयात्रीना बाहेर काढले गेले.


अवकाशयान समुद्रात उतरताच समुद्रा असलेल्या डॉलफि न माश्यांनी यानाला घेरले होते परंतु अमेरिकन नौदालाच्या जहाजानी ताबडतोब कारवाई करत यानाला सुखरुपपणे जहाजावर आणले आणि सर्व यात्रेकरुना बाहेर काढले.
सुनिता विलयमस व इतर यात्रे करुन पुनर्वास केंद्रात


सुनिता विलियमस ही दिर्घकाळ अवकाशात राहिल्याने तिच्यातील शारिरीक बदलामुळे तिला लगेच पृथ्वीवरील वातावरणात एकरुप होता येणार नाही त्यामुळे पुढील काही महिने तिला डॉक्टरांच्या निगरानीत पुनर्वास केंद्रात उपचार घ्यावा लागणार आहे. अवकाशात गुरुत्वकार्षण नसल्याने तेथे चालता येत नाही आणि दिर्घकाळ तेथे राहिल्याने शरिरातील हाडे व इतर बदलामुळे अवकाशयात्रींना पृथ्वीवर चालण्यास अडचणी येतात त्यामुळे अशा वेळी त्यांना पुनर्वासकेंद्रात रहावे लागते.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button