बीड

अखेर ते पाचजण निलंबीत

बीड : देशाची भावि पिढी घडविण्याची जबाबदारी ज्यांच्या खाद्यांवर दिली गेली त्यांनी यापासून पाठ फि रवली आणि शिक्षणासारख पवित्र काम सोडून इतर कामात व नियमबाह्य वागण्यात मग्न असलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाच शिक्षकांना अखेर निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अजूनही सुधारणाची खरच गरज असल्याच बोलल जात आहे.

बीड जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या शाळेत वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले अध्यापन केले नाही व आरटीई कायद्याचा भंग केल्याप्रकरणी आष्टी तालुक्यातील तीन शिक्षकांना, धारूर तालुक्यातील एका शिक्षकांस पोलीस ठाण्यात असलेल्या गुन्ह्याप्रकरणी, तर केज तालुक्यातील सतत गैरहजर असणारा एक अशा ५ शिक्षकास तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश बीड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी गुरुवारी दिले आहेत. एकाच दिवशी पाच शिक्षकांना निलंबित केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आष्टी तालुक्यातील आष्टी (हरिनारायण) येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे अध्यापन न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ चा भंग करणे व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी आष्टी तालुक्यातील ३ शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा (ह.ना.) येथील निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये अष्टेकर डी.डी., बळे लालासाहेब मल्हारी आणि श्रीमती नाईक नवरे मनीषा धोंडीराम या तीन शिक्षकांचा समावेश आहे.
धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथील सहशिक्षक भालेराव डी. डी. यांचे विरुद्ध परळी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम २५ व ४ तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३२३, ३२४, ३९५, ३४१, ५०४ व ५०६ अन्वये दि. ९ जून २०२४ रोजी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर शिक्षक हे शाळा सुरू झाल्याच्या दिवशी दि. १५ जून २०२४ रोजी अनधिकृत गैरहजर असले बाबतचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे डी.डी. भालेराव यांना जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केला आहे. त्यामुळे नियम १९६४ मधील नियम ३ मधील तरतुदीनुसार संबंधितांस निलंबित करण्याचे आदेश दि. २० डिसेंबर रोजी देण्यात आले आहेत.
तसेच केज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसेगाव येथील मुख्याध्यापक राजगिरे बी. के. हे सतत गैरहजर राहिल्या प्रकरणी संबंधीतास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात ५ शिक्षकांना एकाच दिवशी निलंबित केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

WhatsApp Group