ग्रंथालय संघाचे ५९ वे राज्य अधिवेशन १५ ,१६ मार्चला वर्ध्यात , राज्यातून आठशे प्रतिनिधींची उपस्थिती राहणार

वर्धा प्रतिनिधी : ग्रंथालय चळवळ व शासन यांच्यातील दुवा तसेच ग्रंथालय व कर्मचारी यांच्या न्याय मागण्यासाठी सनदशीर मार्गाने लढणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ५९ वे राज्यव्यापी वार्षिक अधिवेशन १५,१६ मार्च रोजी वर्ध्यातील बजाज वाचनालयाच्या सभागृहात राज्य संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष प्रदीप बजाज यांनी आज एका पत्रकाव्दारे दिली आहे. अधिवेशनाचा प्रारंभ शनिवार , १५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता लोक महाविद्यालयातून ग्रंथ दिंडी निघणार असून ती अधिवेशन स्थळी पोहचेल . त्यानंतर दुपारी ग्रंथालयाशी निगडीत तांत्रिक सत्रानंतर , कार्यकारी मंडळ सभा तथा नियामक मंडळ सभा होईल , त्यानंतर सायंकाळी ५ वाजता उद्घाटन समारंभ होईल . सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे .
रविवारी १६ मार्चला सकाळी ९ वाजता पासून अभ्यासिका , बालविभाग व महिला विभाग सक्षम होणे काळाची गरज , ग्रंथालय आनलाईन अंकेक्षण पूर्तता अर्ज व सी एस आर फंड – आयकर सुट सवलत प्रस्ताव आणि राजा राममोहन राय योजना व प्रस्ताव याविषयी वेगवेगळ्या 3 सत्रात तज्ज्ञ मार्गदशन करणार आहेत. दुपारी खुले अधिवेशनात सार्वजनिक ग्रंथालय अडचणी , कर्मचारी वेतनश्रेणी , ग्रंथालय अनुदान वाढ- वर्गाबद्दल आणि नवीन ग्रंथालय मान्यता आदी महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होऊन ठराव पारित केल्यावर समारोप कार्यक्रम होईल .
उच्च शिक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या ग्रंथालयाच्या संबंधीत राज्य सचिव , राज्याचे संचालक, विभागीय संचालक , उपसंचालक व जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांसह राज्य ग्रंथालय संघाचे सातही विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी होणार आहेत . हे वर्ध्यात होणारे तिसरे राज्य अधिवेशन असून यापूर्वीच्या दोन अधिवेशनात शासनाने ग्रंथालय व कर्मचारी यांसंबंधित साकारात्मकता दर्शविली होती , त्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन तेवढेच यशस्वी होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व आयोजाकात आहे, हे अधिवेशनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी समित्या निर्माण करण्यात आल्या असून यात राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील , कार्योपाध्यक्ष राम मेकले , जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. अमृत येवूलकर, मिलिंद जुनगडे , श्रीकृष्ण महाजन , प्रवीण सरोदे यांच्यासह लोक महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक कर्मचारी यांचा समावेश आहे.
