चॅम्पियन्स ट्रॉफ ी ः अंतिम सामन्यात न्यूझिलँड भारता विरुध्द खेळणार, दुसर्या उपात्य सामन्यात दक्षिण अफ्रि का पराभूत

लाहौर – रचिन रविंद्र आणि केन विलियमसनच्या शतकाच्या जोरावर 363 धावांचे लक्ष्य सादर करत आणि त्यानंतर शानदार गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण अफ्रि काला पराभूत करुन न्यूझीलँडने दुसर्या उपात्य सामन्यात विजय मिळवत अंतिम सामन्यांत प्रवेश केला असून 9 मार्चला दुबईत भारत व न्यूझीलँडमध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे.
पाकिस्तानमधील लाहोरच्या गद्दाफ ी मैदानावर प्रथम फ लंदाजी करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलँडकडून रचिन रविंद्रने 101 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 108 धावा केल्या तर विलियमसनने 94 चेंडूत 10 चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने 102 धावा केल्या. ग्लेन फि लिप्सने 27 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. डेरिल मिचेलने 37 चेंडूत 49 धावा केल्या. संघाने 5 गडी गमवून 362 धावा केल्या व दक्षिण अफ्रि का समोर विजयासाठी 362 धावांचे लक्ष्य ठेवले. यावर्षीच्या या स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या असून आता पर्यंत कोणत्याही संघाने या स्पर्धेत ऐवढी धावसंख्या केली नव्हती.
दक्षिण अफ्रि काकडून लुंगी एंगिडीने 72 धावा देवून तीन गडी बाद केले तर कागिसो रबाडाने 70 धावात दोन गडी बाद केले.

रविंद्र चॅम्पियन्स ट्रॉफ ीतील दुसरे शतक – न्यूझीलँडचा रचिन रविंद्रने बांगलादेशा विरुध्द 112 धावा करुन या स्पर्धेतील आपले पहिले शतक केले होते. बुधवारी त्याने दक्षिण अफ्रि का विरुध्द 93 चेेंडूत 100 धावा करुन या स्पर्धेतील आपले दुसरे शतक पूर्ण केले तर आंतरराष्ट्रीय क्रिके्रटमधील एकदिवशीय सामन्यातील हे त्याचे पाचवे शतक आहे.
या चॅम्पियन्स ट्रॉफ ीतील सर्वोच्च धावसंख्या 363 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या दक्षिण अफ्रि का संघाला मात्र लक्ष्य गाठण्यात अपयश आले. उत्तरादाखल खेळताना दक्षिण अफ्रि काला पहिला झटका संघाची धावसंख्या 20 असतानाच रयान रिकल्टनच्या रुपात बसला. यानंतर कर्णधार टेंबा बावुमा आणि रासी वान डर डुसांने अर्धशतक करत संघाची धावसंख्या 125 असतानाच टेंबा बावुमा 56 धावावर बाद झाला. त्याने आपल्या डावात 71 चेंडूत 4 चौकार व एक षटकार मारला. तर रासीने 66 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार मारत 69 धावा केल्या. टेंबा व रासीला सेंटनरने बाद केले.

यानंतर एडेन मार्करम आणि डेव्हिड मिलरने मैदानात बराच वेळ डावाला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु हे दोघेही बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेनला तीन धावावर सेंटनरने बाद केले. डावात मोठे फ टके मारण्याच्यघा नादात मुल्डर आठ धावावर बाद झाला. तर डेव्हिड मिलरने 67 चेंडूत शतक केले.

दक्षिण अफ्रि काने 9 गडी गमावून 312 धावा केल्याने त्यांचा 50 धावाने पराभव झाला. न्यूझीलँडकडून कर्णधार मिचेल सेंटनरने 3, मॅट हेन्रीने 2, ग्लेन फि लिप्सने 2, माइकल ब्रेसवेलने 1 गडी बाद केले.
