व्हीडिओ-फोटो
मायेची उब – भर उन्हात वासराला गायीचे….

बीड शहर – उन्हाळा सुरु झाल्याची चाहूल आता बर्यापैकी जाणवत असून मार्च सुरु झाल्यानंतर दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. परंतु भटक्या गायी व जनावरे मात्र अन्न व पाण्याच्या शोधात एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी भटंकती करत असतात. अशाच भर उन्हात आपल्या हृदयाच्या गोळ्याला अर्थात वासराला भूक लागल्याचे पाहून रस्त्यामध्येच गायीने स्तनपान करुन आपल्या वासराची भूक भागवली.. गाय व वासराचे हे अनोखे दृश्य डॉ.शामसुंदर रत्नपारखी यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात टिपले.

