विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू
मुंबई – महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आज दिनांक 3 मार्च पासून सुरू झाले आहे पहिल्या दिवशी राज्यपाल सी राधाकृष्णन यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. मंडळाची सुरुवात आज संयुक्त बैठकीने मुंबईतील विधानभवनामध्ये सुरू झाली यावेळी सर्व विधिमंडळ सदस्य उपस्थित होते. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी या आदेशनासाठी कंबर कसलेली दिसली आहे. चहापाण्याच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने मुद्द्यांवर आक्रमक होत बहिष्कार घातला होता आज सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार घोषणाबाजी केली गेली विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणारे मुद्दे उपस्थित करून घेरले. सकाळी अधिवेशन सुरू व्हायच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या दोन्ही हातामध्ये बेड्या घालून आले व त्यांनी सरकारचा जाहीर निषेध केला. या अधिवेशनात सरकारकडून विविध प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत व त्याचे कायद्यात रूपांतर केले जाणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे या या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत यामधील विविध योजनांसाठीची तरतूद कशी करेल याकडे विरोधी पक्षांचे लक्ष लागले आहेत विशेषतः लाडकी बहीण योजनेसाठी जी तरतूद करायची आहे त्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार याकडे जनतेचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे हे अधिवेशन वादळी ठरेल की काय असा प्रश्न विचारला जात आहे