बीड

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन – त्याग, पराक्रम व राष्ट्रभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे – प्रा. डॉ. गणेश आडगावकर

शिरूर कासार प्रतिनिधी- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सबंध आयुष्यभर समरसतेचा स्वीकार केलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण जीवन त्याग, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे असे प्रतिपादन कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. गणेश आडगावकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विश्वास कंधारे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. गणेश आडगावकर हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय तुपे कर्मचारी सचिव डॉ. नवनाथ पवळे यांचे प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. गणेश आडगावकर म्हणाले की, सावरकरांचे विचार, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान नेते, विचारवंत, आणि क्रांतिकारक होते. सावरकर हे आपल्या कार्यामुळे भारतीय इतिहासात एक महत्त्वपूर्ण स्थानी आहेत. त्यांचा जीवनप्रवास आणि कार्य आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत प्रभावी ठरले आहे या महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अमलात आणावे असेही ते म्हणाले


अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रा. डॉ. विश्वास कंधारे यांनी सावरकरांच्या जीवनपटाचा आढावा घेत, त्यांच्या संघर्षमय प्रवासावर प्रकाश टाकला. त्यांनी सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारसरणीचा आजच्या पिढीला मार्गदर्शन कसे होऊ शकते, यावर विशेष भर दिला.स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी विचारांचे समर्थक होते आणि त्यांनी “हिंदुत्व” हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी हिंदू समाजाची एकता आणि त्याच्या सांस्कृतिक ओळखीचे महत्त्व सांगितले. त्यांनी हिंदूधर्माच्या सर्वसमावेशकतेचा ठाम पुरस्कार केला आणि धर्म, संस्कृती, आणि इतिहासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान भारतीय स्वातंत्र्यलढ्याला अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांच्या क्रांतिकारी विचारधारेने आणि कार्यपद्धतीने अनेक पुढील पिढ्यांना प्रेरित केले. असेही ते म्हणाले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नवनाथ पवळे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांच्या आभार प्रा. डॉ. संजय सावते यांनी मानले. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button