दहावीची परिक्षा आता वर्षातून दोनदा देता येणार ?

नवी दिल्ली – दहावीच्या परिक्षेत आता जरी नापास झालात तरी घाबरु नका तुम्हांला दोन महिन्याच्या आत दुसर्यांदा परिक्षा देण्याची सुवर्णसंधी असेल आणि त्याचा उपयोग तुम्ही दहावी उत्तीर्ण होण्यासाठी करु शकतात. शासनाचे हे पाऊ ल खरच प्रत्यक्षात उतरल तर विद्यार्थ्यांच शैक्षणिक वर्षाच होणार नुकसान टळेल.
केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावी परिक्षा मंडळाने आता एक नवीन शिफ ारस केंद्र सरकारकडे केली असून यानुसार शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा परिक्षा देण्याचा पर्याय दिला जाणार आहे. केंद्र सरकारला केलेल्या या शिफ ारशीवर मंडळाने शाळा प्रशासन, पालक असोसिएशन, शिक्षक संघटना, धोरण निश्चित करणारे व शैक्षणिक क्षेत्रातील संघटनाकडून 9 मार्चपर्यंत सल्ला मागितला आहे.

विद्यार्थ्याला दोनदा परिक्षा देण्याचा निर्णय झाला तर जे विद्यार्थी नापास होतील त्याना लगेच दोन महिन्यात परिक्षा देता येणार असून त्यात ते उत्तीर्ण झाले तर त्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही. तसेच ज्याना कमी गुण मिळाले आहेत त्यांना अजून चांगले गुण पाहिजे असेल तर त्यांनाही परत एकदा परिक्षा देता येणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना आता वर्षीक परिक्षेची दोनदा संधी मिळणार आहे. यानुसार दहावीची पहिली परिक्षा ही 17 फे ब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत असेल आणि दुसर्यांदा परिक्षा देणार्यांसाठी 5 ते 20 मे दरम्यान परिक्षा होईल.
मंडळाने केलेल्या शिफ ारशीनुसार वर्ष 2026 पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना दोनदा परिक्षा देण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना तीन वेगवेगळे पर्याय असतील ज्यानुसार वर्षातून एकदा परिक्षा देता येईल, किंवा दोनदा परिक्षा देता येईल, जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात चांगले गुण मिळाले नसेल तर त्याला एकाच विषयाचीही परिक्षा परत एकदा देता येईल.

जर विद्यार्थ्यांने दोनदा परिक्षा दिली असेल तर याचा निकाल हा त्याला ज्या परिक्षेत चांगले गुण मिळाले असेल तो निकाल ग्राह्य धरला जाईल. दोनीही परिक्षा ह्या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत असतील. आता दहावीसाठी असलेली पुरवणी परिक्षा पूर्णपणे बंद केली जाईल. जर एखादा विद्यार्थी दोन वेळा परिक्षा देत असेल तर त्याच्या परिक्षा केंद्रात कोणताही बदल केला जाणार नाही. दोनीही परिक्षा देणार्याकडून परिक्षा फि स एकाच वेळी घेतली जाईल. जे विद्यार्थी दोनदा परिक्षा देतील त्यांच्या प्रात्यक्षीक व अंतर्गत परिक्षा एकदाच घेतल्याच जातील त्यांना दोनदा परिक्षा देण्याची गरज नसेल.

