बीड शहरात जोरदार अतिक्रमण हटवा मोहिम : बीड नगर परिषदेच नागरीकांकडून व व्यापारांकडून कौतुक व स्वागत

बीड – बीड शहरात शुक्रवारीही अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहिम जोरदारपणे राबविण्यात आली असून अनेक ठिकाणी याला विरोध झाला परंतु प्रशासनाने शांतपणे व संयमाने ही सर्व अतिक्रमणे हटविल्याने नगर पालिकेचे नागरीक व व्यापार्यांनीही कौतुक केले व स्वागतही केले.
बीड शहरातील असा एकही रस्ता नाही जेथे अतिक्रमण करुन व्यवसाय चालविला जात नव्हता त्यामुळे शहरातील वाहतुककोंडीला आमंत्रण तर मिळत होतच त्याच बरोबर जे व्यापारी भाड्याने दुकाने घेवून व्यवसाय करतात त्यांच्याही व्यवसायावर परिणाम होत होता त्यामुळे शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी सतत होत होती.

बीड नगर परिषदेने अतिक्रमण हटविण्याची मोहिम जोरदारपणे सुरु केली असून अनेक भाग स्वच्छ दिसत आहे. मागील पाच सहा दिवसापासून ही मोहिम सुरु असून शिवजंयतीसाठी ही मोहिम थांबविण्यात आली होती परंतु शुक्रवारी परत एकदा ही धडकपणे राबविण्यात आली असून शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविले आहे.

शुक्रवारी शहरातील बशिरगंज, भाजीमंडई, स्टेडियम कॉम्प्लेक्स रोड, सुभाषरोड, धोंडीपुरा तर बार्शी रोड, नगर रोड, आदर्श मार्केट समोरील अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
नागरीकांकडून स्वागत – शहरातील अतिक्रमणामुळे रस्त्यांची रुंदी कमी होते व वाहन चालविताना त्रास होतो त्यामुळे वाहतुककोंडी होते आणि याचा त्रास सर्वात जास्त नागरीकांना होतो आहे. त्यामुळे नगर परिषदेने अतिक्रमण हटविण्याची जी धडक मोहिम हाती घेतली आहे त्याचे नागरीकांनी स्वागत केले.

