स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका 30 तारखेला प्रेक्षकांचा निरोप घेणार

स्टार प्रवाह या वाहिनीवर मागील चार वर्षापासून सुरू असलेली आणि घराघरात पोहोचलेली व महिलांना आवडती असलेली आई कुठे काय करते ही मराठी मालिका आता 30 नोव्हेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अरुंधती ही भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर हिने ज्या संकटांना तोंड देत आपली कर्तव्य पार पाडले त्यामुळे मराठी विश्वातील मालिकांमध्ये ही मालिका अधिक प्रमाणात घराघरात व महिलांवर अधिराज्य गाजत राहिली होती परंतु 30 नोव्हेंबरला ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अर्थात ही मालिका आता संपणार असल्याने मालिकेतील कलाकार आणि चाहते सुद्धा भावूक झालेले दिसून आले
मालिकेतील अरुंधती ची भूमिका करणारी कलाकार मधुराणी प्रभुलकर ही या मालिकेमुळे घराघरात पोहोचली होती याचबरोबर संजनाची भूमिका करणारी रूपाली भोसले, अनिरुद्ध ची भूमिका करणारा मिलिंद गवळी,यश ची भूमिका करणारा अभिषेक देशमुख, अशितोष ची भूमिका करणारा केळकर अनघाची भूमिका साकारणारी अश्विनी महांगडे व इतर कलाकार यांनी सुद्धा आपल्या भूमिकेला खूप चांगल्या प्रकारे न्याय दिलेला दिसून आला 19 डिसेंबर 2019 पासून ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होती परंतु 30 नोव्हेंबरला ही मालिका आता संपणार आहे
या मालिकेतील सर्व कलाकारांनी अतिशय उत्तम रित्या काम केले आणि त्यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिलेला आहे या मालिकेचे शीर्षक गीत ठाकूर यांनी लिहिले तर अवधूत गुप्ते यांनी ते संगीतबद्ध केले आर्या अंबेकरने ते गायले आहे. या मालिकेमुळे सर्व कलाकार एकत्र आले आणि त्यांनी चार वर्षाचा प्रवास पूर्ण आनंदाने आणि सहकारी वृत्तीने केलेला दिसून आला आता ही मालिका संपत असल्याने महिला वर्ग सुद्धा नाराज दिसून येत आहे आणि भावूक सुद्धा झालेला आहे मालिकेतील सर्व कलाकार आणि त्यांचे चाहते यांचे एक वेगळे नाते यामुळे निर्माण झाले होते पण आता ही मालिका संपत असल्याने या मालिकेतील कलाकरावरील प्रेम चाहते कधीही विसरणार नाहीत.