क्रीडा

तिसर्‍या एकदिवशीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

इंग्लंड विरुध्दची तीन एकदिवशीय सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकली
अहमदाबाद – शुभमन गिलचे शतक, विराट कोहलीचे अर्धशतक, श्रेयस अय्यरची आक्रमक व वादळी झुंज याच बरोबर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उकृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडला 145 धावांने पराभूत करुन एकदिवशीय मालिकेतील तिसरा सामना जिंकत आपला दबदबा कायम ठेवला.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानावर इंग्लंड विरुध्द खेळल्या गेलेल्या तिसर्‍या व अंतिम एकदिवशीय सामन्यात बुधवारी नाणेफे क जिंकून प्रथम फ लंदाजी स्विकारली परंतु रोहित शर्मा लवकरच बाद झाल्याने भारताला धक्का बसला पण विराट कोहलीने शुभमन गिल बरोबर मिळून संघाला सावरले. गिलने उत्कृष्ट व धडाकेबाज फ लंदाजी करत 14 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या व आपल्या एकदिवशीय सामान्यातील कार्यकिर्दीतील सातवे शतक पूर्ण केले. तर विराट कोहलीने बर्‍याच कालावधीनंतर फ लंदाजीत आपली कामगिरी सुधारली व 52 धावा केल्या. श्रेयस अय्यरनेही धडाकेबाज फ लंदाजी करत 78 धावा केल्या आणि के.एल.राहुलने 40 धावा केल्या. हर्षित राणाने 49 व्या षटकात गस अ‍ॅटकिंसनच्या चेंडूवर एक षटकार ठोकल्याने भारताने 350 धावा पूर्ण केल्या. परंतु राणा याच षटकातील शेवटच्या चेंडूवर जोस बटरलकडे झेल देवून बाद झाला.


शेवटच्या षटकात भारताने दोन गडी गमविले होते यात अर्शदिप सिंह हा धावबाद झाला तर वॉशिंग्टन सुंदर हा हॅरी ब्रुककडे झेल देवून बाद झाला, या दोघांनाही मार्क वुडने बाद केले. भारताने एकूण 356 धावा केल्या.


प्रत्युत्तरा दाखल खेळण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला सातव्या षटकात पहिला धक्का बसला. अर्शदीप सिंहने एक मंद गतीचा चेंडू टाकला त्यावर डकेट मोठ शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असतानाच मिड ऑफ वर कर्णधार रोहित शर्माकडे झेल देवून बाद झाला.त्याने 22 चेंडूत 34 धावा केल्या यात आठ चौकार मारले.
यानंतर अर्शदिपने 9 व्या षटकात बाउंसर चेंडू टाकला यावेळी सॉल्टने अपर कट खेळला परंतु अक्षर पटेलने पॉइंट पोजिशनवर त्याचा झेल पकडला व तो बाद झाला त्याने चार चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. 18 व्या षटकामध्ये कुलदीप यादवने टॉम बॅटनला यष्टीरक्षक के.एल.राहुलकडे झेल देण्यास मजबूर केले. टॉमने 4 चौकार व दोन षटकाराच्या मदतीने 41 चेेंडूत 38 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 21 व्या षटकात जो रुटचा त्रिफ ाळा उडविला
रुटने 2 चौकाराच्या मदतीने 29 चेंडूत 24 धावा केल्या. 25 व्या षटकात हर्षित राणाने जोस बटलाचा त्रिफ ाळा उडविला. जोसने 9 चेंडूत सहा धावा केल्या.


सामान्यातील 27 व्या षटकात हर्षित राणाने हॅरी ब्रुकचा त्रिफ ाळा उडविला. हॅरीने 1 षटका व 1 चौकारच्या मदतीने 26 चेंडूत 19 धावा केल्या. तर 30 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने लियम लिव्हिंगस्टनला यष्टीचित केले. लियमने 1 चौकाराच्या मदतीने 23 चेेंडूत 9 धावा केल्या.


सामन्यातील 31 व्या षटकात हार्दिक पांडयाने आदिल राशीला शून्य धावावर बाद केले. त्यानंतर हार्दिकने 33 व्या षटकात मार्क वुडला बाद केले. मार्कने 7 चेंडूत नऊ धावा केल्या.

याचवेळी गस अ‍ॅटकिंसनने 33 व्या षटकात हार्दिक पांडयाच्या चेंडूवर चौकार मारुन इंग्लंड संघाची धावसंख्या 200 पूर्ण केली. परंतु 35 व्या षटकात अक्षर पटेलने अ‍ॅटकिंसनला त्रिफ ाळा बाद केले. अ‍ॅटकिंसनने 6 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 19 चेंडूत 38 धावा केल्या.


इंग्लंडचा पूर्ण संघ 34.2 षटकात सर्व बाद 214 धावा करु शकला. भारताने हा सामना 145 धावा जिंकला असून तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने इंग्लंड संघाला हरविले.
या सामन्यात भारताकडून गोलंदाज हर्षिद राणा, हार्दिक पांडया, अक्षर पटेल व अर्शदिपने प्रत्येकी दोन गडी बाद केेले.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button