साडे सहाशे पेक्षा जास्त स्वतःच्या ग़ज़ल-भजन स्वरबध्द करणारे संगीतकार स्वर साधक पं.ह्रषिकेश महाले

प्र. आपला संगीत प्रवास कसा सुरु झाला ?
उ. मी 1979 साली पहिला लाईव्ह पर फ ॉर्मन्स केला आणि रसिकांनी भरभरुन दाद दिली. त्याच दरम्यान स्वरतीर्थ सुधीर फ डके अर्थात बाबूजी यांच्या मार्गदर्शनाखाली मी संगीतबध्र्द केलेला व गायलेल्या मराठी भक्तीरचनांची लाँग प्ले (LP) निघाली. त्यानंतर त्याकाळी कॅसेटपण आल्या आणि खूप विकल्या गेल्या. रसिकांनी कार्यक्रमा रुपाने आणि (LP)/कॅसेट खेरदी करुन आशिर्वाद दिला आणि माझा स्वयंनिर्मित रचनांचा प्रवास सुरु झाला.
मी एक संगीत साधक असल्यामुळे अजूनही ही कठोर तपश्चर्या सुुरुच आहे. मी मागील 46 वर्षापासून सातत्य ठेवून साधना, परफ ॉर्मन्स,त्या रेकॉर्डिंग, नवनवीन रचना करणे व त्या रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवणे हे अविरत कार्य सुरु ठेवलंय याला मी सिध्द केलंय असे म्हणू शकत नाही पण रसिकांचे प्रेम नक्कीच मिळत आहे.
प्र. संगीत क्षेत्रात कशा प्रकारचा बदल आपल्याला जाणवतो ?
उ. काळानुसार रेकॉडिंग क्षेत्रात बदल होतच असतात, त्यानुसार गीताला चाल लावणे तसेच आहे, पण एक गीतकार, संगीतकार, गायक बसून गाण निर्माण करणे हे आता फ ारस होत नाही. डिजिटल पध्दतीमुळे प्रत्यक्ष भेट कमी झाली. त्यामुळे गाण रेकॉर्डिंगसाठी एका वेगळ्याच मेथडनी जाते. चाल लावून गीतकाराला दिल जात आणि त्यावर गीत लिहिल जात. गीत लिहिताना त्यातील छंद बर्याचदा यामुळे जमत नाही अशा अडचणी चाल लावताना येतात, पण रेकॉर्डिंगची तांत्रिक पध्दत खूप प्रगत झाली हे मात्र नक्की.

प्र. नव तंत्रज्ञानामुळे वादक, उपकरणे यांची भूमिका काय राहिली आहे ?
उ. पूर्वी लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायची आणि गायक गायीका/कोरस टिम एकत्र येऊन मग रेकॉर्डिंग व्हायची . तेव्हांचे स्टुडिओ फ ार प्रगत नव्हते त्यामुळे ध्वनीमुद्रण हे खूप कुशलतेने करायचे परंतु मागील काही दशकांपासून अशा प्रकारचे ध्वनीमुद्रण खूप कमी वेळा होते. यामागील अनेक कारणे आहेत, त्यातील एक म्हणजे प्रोडयूसरच बजट आणि दुसर म्हणजे मिडी कीबोर्डवरच संगीत व वेगवेगळे वाद्यांचे आवाज काढून हुबेहूब रेकॉर्डिंग केल जात. गायक त्याच्या सोयीनं येऊन आवाज रेकॉर्ड करुन जातात आणि गाण बनून जात ते कॉम्प्युटरवर बसलेल्या प्रोग्रामर कडून होत.
प्र. डिजिटल युगात कलाकारांच्या कामावर कोणाता परिणाम झाल्याच आपल्याला वाटत ?
उ. अगदी खरंय आता मी आधीच सांगितल्याप्रमाणे फ ार कमी वेळा वादक येऊन थेट वाजवून रेकॉर्डिंग करतात, ही कला आहे आणि कलाकारही आहेत पण स्टुडिओमध्ये की बोर्डवर व कॉम्प्युटरवर संगीत तयार केलं जात आणि मग प्रोसेस करुन फ ायनल रेकॉर्डिंग तयार होते. अशामुळे वादकांच्या आणि गायकांच्याही रोजगारावर परिणाम झालाय हे नक्की. वादक, गायक तसेच गीतकारांना कलाकारांना कमी काम मिळतं. त्यामुळे रोजगारही कमी झालाय, याची खंत एक संगीतकार म्हणून मला वाटत राहते.
प्र. एलपी ते डिजिटल माध्यम ह्या प्रवासाकडे एक संगीतकार म्हणून तुम्ही कसे पाहतात ?
उ. पूर्वीच्या काळात संगीत मुद्रीत करण्याचे साधने हे LP आणि त्यानंतर कॅसेट आल्या, त्यापुढील काळात सीडीजचा प्रकार बाजारात आला. सीडी म्हणजे कॉम्प्यक डिस्क ज्यात 6-9 गाणी असायची ज्याला आपण अलबम म्हणतो. ती सीडी काही काळानंतर खराब होते व गाणी ऐकू येण थांबत परंतु आता सीडीही कालबाह्य झाली आणि त्याची जागा ही यूटयूब सारख्या मोठया व डिजिटल दृश्य माध्यमाने घेतली आहे. याच बरोबर अनेक ऑडिओ आणि व्हिडीओ अॅप्सही उपलब्ध आहेत. ज्यावर क्वॉलिटीमध्ये गाणी/संगीत ऐकायला मिळत. संगीतकार एक एक गाण अपलोड करुन लोकांना ऐकवतात व रसिक त्याचा ऑडिओ/व्हिडीओच्या माध्यमातून आस्वाद घेतात.
प्र. संगीतकार कसा घडतो व त्यासाठी कोणती मेहनत घ्यावी लागते असे आपल्याला वाटते ?
उ. गायन, वादन, पेटींग अशा कोणत्याही कला शिकता येतात व रियाज व अभ्यास करुन वाढवताही येतात, पण संगीतकार हा घडवता येत नाही. संगीत निर्माण करण हे जन्माला येताना देवाने दिलेली ही एक देणगीच असून संगीत निर्मिती शिकवता येत नाही ते अद्वितीय वरदान आहे. त्याबद्दल ईश्वरचरणी नतमस्तक व्हाव.
प्र. नव तरुण संगीतकारांनी संगीत साधना कशी करावी ?
उ. मी एक संगीत साधकच आहे आणि गेली 46 वर्षापासून संगीतकार म्हणून काम करतो आहे आणि याच नात्याने मी इतकच सांगेन की जर आपण गायक असाल तर रोज 8 ते 10 तास रियाज व अभ्यास करावा. संगीत अथांग महासागर आहे आणि खूप खोल आहे, विशाल आणि भव्य आहे. त्याच्या अंतिम टोकापर्यंत कुणीही पोहेाचू शकत नाही पण रियाज करुन त्या नादब्रह्माच दर्शन नक्की होऊ शकत.

प्र. आपल्याला आता पर्यंत किती आणि कोणते पुरस्कार प्राप्त झाले आहेत ?
उ. संगीतक्षेत्राची सेवा करत असतानाच मला रसिकांकडून जी दाद मिळाली तो सर्वांत मोठा आशिर्वाद आहे. त्याच बरोबार मला आता पर्यंत 4 राष्ट्रीय व 67 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत तर नुकताच यंदा मला एक पंजाबी गीत मित्र प्यारे नू आणि अखिया हरि दर्शन की प्यासी या भजनाला असे दोन गाण्यांना संगीतकार व गायक म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच नुकताच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कार समितीतर्फे यंदाचा भारतीय रत्न हा पुरस्कार मिळाला असून याचे स्वरुप स्मृतिचिन्ह,पदक व सन्मानपत्र असा आहे.
प्र. आजच्या नव कलावंताना तुम्ही काय संदेश द्याल ?
उ. आज काल सर्वांना झटपट प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचायच असत आणि त्यात काही जण यशस्वीही होतात ते फ ार काळ टिकू शकण अवघड असतं. नवीन पिढीने रियाज हा एक साधना म्हणून करावी ते एका अंधारात लावलेल्या प्रकाशाच्या किरणाप्रमाणे रसिकांपर्यंत पोहोचते.
मुलाखातकार – डॉ.श्रीकांत तापीकर, वृत्तपर्वचे पुणे विशेष प्रतिनिधी
