मनोरंजनमुलाखत

‘फुलवंती’नंतर प्राजक्ता माळीनं गाठला आश्रम, ध्यानधारणेतगुंतवलं मन

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी तिच्या चाहत्यांसाठी तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अपडेट्स शेअर करत असते. अलीकडे तिचा ‘फुलवंती’ हा सिनेमा रिलीज झाला होता आणि हा सिनेमा आता अमेझॉन प्राईम व्हिडिओवर सुरू आहे. या चित्रपटाला ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्राजक्ता सध्या बंगळुरू शहरामध्ये आर्ट ऑफ लीव्हिंगच्या कोर्ससाठी दाखल झाली आहे. तिनं या दरम्यान एक व्हिडिओ शूट करुन चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे.

तिला बंगळुरूतील श्री श्री रविशंकर यांचा आश्रम इतका आवडला आहे की जर कलाकार नसते तर इथं आश्रमवासी झाले असते, असं तिनं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. “महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर ह्या घडीला मी बंगलोर आश्रमात आश्रमवासी असते. होय होय…इथे राहणं, ध्यान करणं इतकं आवडतं. आश्रमवासी नाही होऊ शकले तरी निदान १५-२० दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन. आणि सातत्याने इथे येत राहीन., “ असं तिनं लिहिलंय. या व्हिडिओत ती आर्ट ऑफ लीव्हिंग विषयी आपल्या चाहत्यांना सांगताना दिसत आहे.प्रजाक्तानं नवीन अपडेटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. यात ती श्री श्री रविशंकर यांच्यासह दिसत आहे.

“पुन्हा एकदा गुरुदेव यांची समक्ष भेट झाली, महत्त्वाचं संभाषण झालं. भानू नरसिंम्हण यांचीही यानिमित्तानं भेट झाली. आर्ट ऑफ लीव्हिंगचा एक अ‍ॅडव्हान्स कोर्स करत आहे.” हा आपला 15 वा कोर्स असल्याचंही तिनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button