डॉ.अविनाश कुलकर्णी लिखीत संस्कृतीचे अर्थशास्त्र पुस्तक

वृत्तपर्वचे टॉप 10 पुस्तके
पुस्तक परिचय
डॉ.अविनाश कुलकर्णी लिखीत संस्कृतीचे अर्थशास्त्र या पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचे अर्थशास्त्र याविषयची ओळख करुन दिली असून याच बरोबर भारतातील कला आणि संस्कृतीच्या आर्थिक संदर्भाचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे
.
त्यांनी या पुस्तकामध्ये सांस्कृतिक अर्थशास्त्रातील संकल्पना व सिध्दांताचे विवेचन व विश्लेषण केले आहे आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची आणि त्या अंतर्गत संस्थांची भूमिका आणि विविध क्रियाकलाप यांचे विवेचन व विश्लेषण केले आहे.

याच बरोबर त्यांनी महाराष्ट्रातील सांस्कृतिक धोरणा अंतर्गत यामध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण 2010 व त्याचे आर्थिक आधार आणि त्याचे मूल्यमापन केले आहे.
भारतीय तीर्थक्षेत्र विकासाचे धोरण यावर त्यांनी देशातील मंदिर व तीर्थक्षेत्र विकासाच्या धोरणाचे आर्थिक विश्लेषण केले आहे.
सर्जनशील उद्योग व सांस्कृतिक वस्तू यावर प्रकाश टाकताना भारतातील निवडक सर्जनशील उद्योग व सांस्कृतिक वस्तूंचे अर्थशास्त्रीय विवेचन व विश्लेषण केले आहे. याच बरोबर देशातील निवडक तीर्थयात्रा, सण-उत्सव आणि मेळ्यांचे आर्थिक पैलू मांडले आहे. त्यांनी व्यक्तिगत -कौटुंबिक सांस्कृतिक समारंभ/कार्यक्रम या विषयावरील आर्थिक क्रियाकलाप यांचा ऊहापाह केला आहे.
डॉ.अविनाश कुलकर्णी लिखीत संस्कृतीचे अर्थशास्त्र या पुस्तकाला डॉ. संतोष दस्तने यांनी प्रस्तावना लिहिली असून हे पुस्तक पुण्यातील सुनिधी पब्लिशर्स यांनी प्रकाशीत केले आहे. या पुस्तकाची किंमत 250/- आहे. पुस्तक उपलब्धतेसाठी 020-24457118 मोबाईल क्रमांक. 9021482769, 9423091118 वर संपर्क करावा.
