समर्थ पादुका पूजन व भिक्षा फे री बीडमध्ये संपन्न

सज्जनगडावरुन निघालेल्या श्री रामदास स्वामींच्या पादुकांची दर्शन व भिक्षा फे री बीड शहरात संपन्न झाली असून रामदास स्वामींचे वंशज श्री भूषण स्वामी महाराज यांचे जागो जागी नागरीकांनी पाद्य पुजाकरुन स्वागत केले.
समर्थ रामदास स्वामींचे वंशज भूषण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली क्रांती नगर , सन्मित्र कॉलनी, जवाहर कॉलनी हनुमान मंदिर, राजीव गांधी चौक मार्गे जिजामाता रोडवरून ज्ञानेश्वर नगर, भक्ती कन्स्ट्रक्शन येथे भिक्षा फे री काढण्यात आली
यावेळी भक्त गणांनी भूषण स्वामी यांचे दर्शन घेतले व यथायोग्य धान्याचे दान केले त्यानंतर दुपारी ही फेरी श्रीमद जनीजनार्दन संस्थान, थोरले पाटांगण येथे पोहोचली दुपारी उपासना आणि सायंकाळी कीर्तन झाले.
या फेरीत सज्जनगड सेवेकरी कौस्तुभ जोशी, पवन कुलकर्णी, प्रा.दिपक देशमुख, प्रा.संतोष जोशी, प्रा.संजय पत्की, प्रविण इंगळे, श्रीराम मुळे, बाळासाहेब अंबेकर, नंदकुमार झरीकर आदी फेरीत सामिल झाले होते.
