देश – विदेशातील 139 जणांना पद्म पुरस्कार
महाराष्ट्रातील – तिघांना पद्मभूषण,11 जणांना पद्मश्री पुरस्कार
नवी दिल्ली, दर वर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिना निमित्ताने राष्ट्रपतीनी कला, समाजसेवा, सार्वजनिक जीवन, विज्ञान तंत्रज्ञान, साहित्य, शिक्षण, क्रिडाक्षेत्रासह अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी करणार्यांना 139 जणांना पद्मपुरस्काराने सन्मानीत करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यावर्षी 139 जणांना पद्मपुरस्काराने सन्मानानीत करण्याची घोषणा केली आहे. यात 7 जणांना पद्म विभूषण, 19 जणांना पद्म भूषण, आणि 113 जणांना पद्मश्रीने सन्मानीत करण्यात आले आहे. या पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये 23 महिला, 10 विदेशी/एनआरआय/पीआयओ/ ओसीआय आणि मरणोत्तर 13 जणांचा समावेश आहे.
पद्मविभूषण पुरस्कार विजयते – दुव्वर नागेश्वर रेड्डी – वैद्यकियक्षेत्र – तेलंगाणा, सेवानिवृत्त न्यायाधीश जगदिश सिंह खेहर सार्वजनिक क्षेत्र- छत्तीसगड, श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लाखिया – कला – गुजरात, लक्ष्मीनारायण सुबमण्यम् – कला- कर्नाटक, एम.टी.वासूदेवन नायर (मरणोत्तर) – साहित्य आणि शिक्षण – केरळ, ओसामु सुझुकी (मरणोत्तर) – व्यापार व उद्योग – जपान, शारदा सिन्हा (मरणोत्तर) – कला- बिहार

महाराष्ट्रातील या व्यक्तींना मिळाला पद्मभूषण पुरस्कार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी – राजकियक्षेत्र, दिवंगत पकंज उदास -कलाक्षेत्र, शेखर कपूर -कलाक्षेत्र यांना पद्मभूषण पुरस्कार घोषीत झाला आहे.

पद्मश्री पुरस्कारा – अच्युत रामचंद्र पालव, अरुधंती भट्टाचार्य – व्यापार व उद्योग, अशोक लक्ष्मण सराफ – कलाक्षेत्र, अश्विनी भिडे देशपांडे-कलाक्षेत्र, चैत्रम देवचंद पवार-समाजीक काम, जसपिंदर नरुला-कलाक्षेत्र, मारुती भूजुंगराव चित्तमपल्ली – साहित्य व शिक्षण, रणेंद्र भानू मजुमदार -कलाक्षेत्र, सुभाष खेतुलाल शर्मा -कृषी, वासुदेव कामत -कलाक्षेत्र, विशाल डांगरे -औषधशास्त्र यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले गेले.
