महाराष्ट्र व बडोदा क्रिकेट संघाचा नाशिक मधील मैदानावर रंगणार सामना…

देशांतर्गत खेळण्यात येणाऱ्या रणजी करंडक ेट स्पर्धेत अंतर्गत नाशिक शहरात तब्बल सहा वर्षानंतर महाराष्ट्र व बडोदा क्रिकेट संघ एकमेकांच्या विरुद्ध क्रिकेट सामना खेळणार आहे त्यामुळे नाशिककरांच्या उत्कंठा वाढीस लागलेली दिसून आली आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळांने (बीसीसीआय) ने नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची दुरुस्ती केल्यानंतर तब्बल सहा वर्षानंतर देशांतर्गत खेळण्यात येणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील एक चार दिवसीय सामना महाराष्ट्र व बडोदा संघामध्ये या ठिकाणी खेळण्यात येणार आहे यासाठीची तयारी क्रिकेट नियंत्रण मंडळाने पूर्ण केलेली आहे आणि गुरुवारपासून या ठिकाणी या दोन संघांमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. देशांतर्गत खेळण्यात येणाऱ्या विविध क्रिकेट स्पर्धांपैकी रणजी करंडक ही एक प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते आहे आणि यासाठी वेगवेगळे संघ भारतातून खेळण्यासाठी येत असतात महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा आता नाशिक येथे महाराष्ट्र व बडोदा क्रिकेट संघामध्ये खेळली जाणार आहे.