कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये 24 जानेवारीला विनामूल्य तांत्रिक प्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर : नवीन वर्षाचे औचित्य साधून शुक्रवारी दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये भव्य टेक्निकल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
नववर्षा निमित्त आजच्या युवकांना जगात वावरताना आणखी परफेक्ट व्हावे म्हणून कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट नेहमी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत असते विविध प्रदर्शन भरवत असते. त्या माध्यामातून विद्यार्थ्याना नव्या तंत्रज्ञानाची ओळख केली जाते आणि ती शास्त्रशुद्ध ओळख व्हावी म्हणून ते सतत प्रयत्नशिल असतात. हा धागा पकडून आता कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट ने प्रदर्शन आयोजीत केले आहे.

हे प्रदर्शन सकाळी दहा ते पाच या वेळेत कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट पुष्पनगरी बस स्टँड रोड छत्रपतीसंभाजीनगर येथे भरवण्यात येणार आहे. प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स , एसी, मोबाईल रिपेरिंग अशा वेगवेगळ्या कोर्सेसचे प्रोजेक्ट ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी 9324934356 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
