बीड शहरातील स्वच्छतेसाठी रूपाली देशपांडे कडून मुख्याधिकाऱ्यांना झाडू व टोपल्याच वाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान देशभर सुरू केले परंतु आजही अनेक शहरांमध्ये अस्वच्छता दिसून येते त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बीड शहर आहे आणि जागोजागी या शहरात कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकच्या वस्तूंचे ढीग आजही पडले दिसून येतात परंतु नगरपालिकेला ते दिसत नाही यासाठी रूपाली देशपांडे यांनी एक अनोखे आंदोलन करत नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी अंधारे मॅडम यांना टोपल आणि झाडूच वाण दिले आहे आणि आता तरी स्वच्छता करा अशी कळकळीची विनंती त्यांनी केलेली आहे. बीड शहर तसं खूप लहान आहे तरी आज अडीच ते तीन लाख वस्तीच शहर आहे परंतु शहरांमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग आजही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत त्यामुळे स्वच्छता अभियान हे कागदावरच आहे की काय असं दिसून येत आहे दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी थोडीफार स्वच्छता केली जाते परंतु आता सध्या कचऱ्याचे ढीग इतके वाढले आहे की रस्त्यावर चालणे सुद्धा अवघड होऊन बसले आहे त्यामुळे नगरपालिकेने या स्वच्छता अभियानाकडे लक्ष द्यावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रूपाली देशपांडे यांनी अनेक वेळा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांना वेळोवेळी निवेदन दिले परंतु त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे रूपाली मॅडम यांनी अखेर सोमवारी दिनांक 20 जानेवारी रोजी नगरपरिषद मुख्यालयमध्ये पोहोचून मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांना संक्रांतीचे वाण म्हणून टोपल आणि झाडू देण्याचे ठरविले परंतु अंधारे मॅडम यांची भेट न होऊ शकल्याने त्यांनी अखेर त्यांच्या दालनामध्येच टोपल आणि झाडू ठेवून एक प्रकारे निषेधच व्यक्त केलेला आहे आता तरी स्वच्छता अभियानाकडे लक्ष देऊन बीडमध्ये असलेले कचऱ्यांचे ढिगारे उचलावी अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की बीड शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीगारे आहेत आणि या संदर्भात वेळोवेळी मी वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा याचे निवेदन दिले परंतु अद्याप कारवाई झाली नाही त्यामुळे हे अनोखी आंदोलन करण्याचे पाऊल उचलावे लागले आहे असे त्यांनी सांगितले.