
अमेरिकेचे नतुन अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी रात्री भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता शपथ घेणार आहेत आणि त्यांचा कार्यकाळ हा चार वर्ष राहणार आहे त्यांच्या या विजयानंतर आत्तापर्यंत मागील दीड महिन्यांमध्ये विविध प्रकारचे तर्कवितर्क लावण्यात आले असून जगामध्ये शांती निर्माण होईल अशी आशा अनेकांनी व्यक्त केलेली दिसून येत आहे परंतु यांच्या शपथविधीनंतर खरंच जग बदलेले का असा एक संशय किंवा एक चर्चा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे

जगभरामध्ये शांती निर्माण होईल असं बोललं जात आहे विशेषतः रूस आणि युकेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा पूर्णविराम या ठिकाणी होईल आणि दोन्ही देशांमध्ये शांति स्थापित होईल परंतु सध्याच्या ज्या वातावरणामध्ये जग आहे त्यामध्ये फक्त युकेन आणि रशिया यांच्यातील युद्धच नाही तर विविध ठिकाणच्या विशेषतः मध्य आशय खंडामध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये इजराइल विरुद्ध इतर यांच्यात जो वाद आहे तोही मिटला पाहिजे तरच मध्य आणि पूर्व आशिया आणि मध्य युरोपमध्ये शांती स्थापित होईल अशी चर्चा होणे गरजेचे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रशासन काळामध्ये फक्त जगभरामध्ये शांतीच स्थापित होणे गरजेचे आहे असे नाही तर जगभरामध्ये जो व्यापार असंतुलन आहे तेही संतुलित होणे गरजेचे दिसून येत आहे विशेषतः मध्य आणि पूर्व आशिया आणि दक्षिण आशियातील राष्ट्रांमध्ये जो एक असमतोल आहे तो कधीतरी संतुलित होणे गरजेचे दिसून येत आहे
चीनच्या व्यापार आक्रमणाचा सामना ट्रम्प प्रशासन कसे करेल हे पाहणे गरजेचे आहे कारण आम्ही त्याची घसरती अर्थव्यवस्था आणि व्यापारामध्ये चीन बलाढ्य होत असलेले पाहून ट्रम्प यांनी असमतोल व्यापारावर भाष्य करत चिनी आक्रमणाला तोंड देण्यासाठी नवीन रणनीती आखली जाईल असे बोलले होते त्यामुळे आगामी काळामध्ये चीन विरुद्ध अमेरिका असा व्यापार सामना जगभरामध्ये दिसून येईल यामध्ये भारत कुठे आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे भारताबरोबर अमेरिकेचे संबंध मागील काही दशकांमध्ये सुधारले होते परंतु जो बायडन यांच्या प्रशासन काळामध्ये ते काही विषयी तणावपूर्ण आणि विरोधी भाषी राहिलेले दिसून येते कारण भारताबरोबर अमेरिकेचे जे संरक्षण संबंध आहे त्यात अनेकदा कटूता आलेले दिसून येते विशेषतः भारतीय हवाई दलासाठी जे तेजस नावाचे हलके लढाऊ विमान भारताने बनवले आहे
त्यासाठी लागणारे इंजिन हे अमेरिकेवरून भारत घेणार होता परंतु अमेरिकेच्या धडसर वृत्तीमुळे आणि आडमुठ्या धोरणामुळे भारताच्या तेजस विमानासाठी इंजिन मिळू शकेल नाही यामुळे दोन्ही देशांमध्ये जो गैरसमज आणि तणाव निर्माण झाला आहे तो बाईडन प्रशासनामध्ये एक मोठा अडथळा ठरला होता परंतु ट्रम्प यांच्या या काळामध्ये आता याला चालना मिळेल आणि भारताला जे इंजिन हवे आहे ते मिळण्याचा मार्ग निघेल अशी आशा बोलली जात आहे भारत आणि अमेरिका संरक्षणाबरोबरच व्यापार असंतुलन तर हा एक कळीचा मुद्दा ठरेल. कारण वाढती आयात हा भारतासमोरील मोठा प्रश्न आहे आणि तो कमी करण्यासाठी भारतीय कंपन्यांबरोबर विदेशी कंपन्यांची साथ घेणं गरजेचे ठरत आहे यामध्ये अमेरिकेचे योगदान किती असेल हे पाहणेही आगामी काळामध्ये महत्त्वाचे ठरेल.

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षांमध्ये जो मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया असे दोन प्रोजेक्ट केले असून भारतामध्येच उत्पादित वस्तूंचा वापर वाढवावा हा त्यामागचा उद्देश आहे आणि हाच उद्देश आता अमेरिकेचा नवीन प्रशासन राबविली असे दिसून येत आहे कारण त्यांनीही अमेरिका फर्स्ट ही पॉलिसी मागील चार वर्षांपूर्वीही त्यांच्या पहिल्या कार्यकाळात राबवली होती आणि तिच आता त्यांनी राबविण्याचे ठरवलेलं दिसून येत आहे
त्यामुळे अमेरिका फर्स्ट या धोरणानुसार जगभरामध्ये परत एकदा व्यापारामध्ये असंतुलन निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे कारण प्रत्येक राष्ट्र हे अमेरिकेमध्ये निर्यातीवर जास्त भर देत असतं त्यामुळे भारताची सुद्धा निर्यात किती राहील भारताचा याला किती फायदा होईल की तोटा होईल हे पाहणे गरजेचे आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर खरंच जग बदलेल का ? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरत आहे आणि भारताला याचा काय फायदा होईल हे आगामी काळामध्ये पाहायला मिळेल परंतु आशिया खंड युरोप खंड आणि आफ्रिका खंडामध्ये ज्या संतुलन किंवा असंतोष किंवा अस्थिर परिस्थिती आहे ती सुधीरेल का ? ट्रम्प यांचे प्रशासन कसे धोरण राबविते आहे यावर अवलंबून असेल पण जग बदलेल हे मात्र आता दिसेल आणि त्याचा परिणामही आपला जाणवेल.
डॉ. शामसुंदर रत्नपारखी
(संपादक)
