नोव्हेंबर महिन्यात व्यापार तोटा वाढून 3.21 लाख कोटी रुपयांवर
नवी दिल्ली- देशाच्या आयात – निर्यात व्यापारामध्ये नोव्हेंबर महिन्यात तोटा वाढला असून तो 3.21 लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. तर भारताच्या निर्यातीमध्ये मात्र घट झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील देशातील आयात-निर्यात संबंधातील आंकडेवारी समोर आली असून यानुसार या महिन्यात माल आयात व्यापार (मर्चेडाइज ट्रेड डेफि सिट) वाढून 37.84 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 3.21 लाख कोटी रुपयांवर राहिला आहे. तो ऑक्टोबर महिन्यात 27.1 अब्ज डॉलर होत म्हणजे तो 2.30 लाख कोटी रुपये होता.
नोव्हेंबर महिन्यात भारतातील मालाची निर्यात 4.85 टक्क्याने घसरुन तो 32.11 अब्ज डॉलर म्हणजे 2.73 कोटी रुपये राहिला तर मालाची आयात 27.04 टक्क्याने वाढून 69.95 अब्ज डॉलर म्हणजे 5.94 लाख कोटी रुपये राहिला. भारताचा व्यापार ऑक्टोंबर महिन्यात निर्यात 39.2 अब्ज डॉलर म्हणजे 3.33 लाख कोटी रुपये आणि आयात 66.34 अब्ज डॉलर म्हणजे 5.63 लाख कोटी रुपये राहिला होता.
एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आयातीमध्ये वाढ
मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान देशात निर्यात क्षेत्रात मागिल वर्षातील एप्रिल-नोव्हेंबरच्या तुलनेत 2.17 टक्क्यांची वाढ झाली मात्र याच दरम्यान आयात 8.35 टक्क्यांने वाढली सुध्दा. निर्यात कमी आणि आयात जास्त झाल्याने देशाच्या व्यापार क्षेत्रात तोटा झाला आहे.