ताज्या बातम्याबीड
आष्टी तालुक्यात दोन सख्ख्या भावांची हत्या तर एक भाऊ गंभीर जखमी

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी तीन संख्या भावांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे व त्याला अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आष्टी तालुक्यातील हातोळण येथील रहिवासी असलेले अजय विलास भोसले , भरत व कृष्णा भोसले हे तीन सख्खे भाऊ गुरुवारी वाहिरा येथे आले होते तेथे दुपारपासूनच त्यांच्या समाजातील काही लोक जमा होऊन बसले होते व रात्रीच्याला नऊ ते दहा च्या दरम्यान त्यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये अजय व भरत यांचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याला अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेचा तपास अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत
