‘कोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स’ च्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टर्स करणार मार्गदर्शन

काेहिनूर पॅरामेडिकल आणि कमलनयन बजाज यांच्यात सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर : कोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस (KCPS) ची स्थापना ई स. 2011 मध्ये आरोग्य सेवा उद्योगाला कुशल तंत्रज्ञ प्रदान करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. आमचे 90% पेक्षा जास्त विद्यार्थी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक सेंटर्स या वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत.
KCPS मध्ये पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन, एक्स-रे व एम. आर. आय. टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, O.T./I. C.U. टेक्निशियन या क्षेत्रातील २ वर्षाचे प्रॅक्टिकल वर आधारित अभ्यासक्रम सैद्धांतिक ज्ञान, व्यावहारिक प्रशिक्षण आणि हॉस्पिटल पोस्टिंगच्या मिश्रणाने सुरु केले आहेत. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षापासूनच विद्यार्थी हॉस्पिटल पोस्टिंग कम ऑब्झर्व्हर-शिपवर उपस्थित राहतात.
कमलनयन बजाज रुग्णालय, मराठवाडा वैद्रद्यकीय आणि संशोधन संस्था हे संपूर्ण मराठवाड्यातील उच्च दर्ज्याचे व नामांकित रुग्णालय आहे. KCPS पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपकरणे आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तज्ज्ञ डॉक्टर्स व टेक्निशियन तेथे विद्यार्थानां मार्गदर्शन करणार आहेत. अनेक प्रकारच्या रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणारे उपचार ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ते पुढील वाटचाली साठी तयार होतील. आणि हॉस्पिटल लाही त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांचा रुग्णांची सेवा करण्यासाठी हातभार होणार आहे.
या उद्देशासाठी, KCPS आणि कमलनयन बजाज हॉस्पिटल यांच्यात 6 जानेवारी 2025 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. कमलनयन बजाज हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॉर्ज फर्नांडिस, वैद्यकीय संचालक – डॉ. अजय रोट्टे शैक्षणिक व संशोधन प्रमुख डॉ. मिलिंद वैष्णव, तसेच डॉ. जॉर्ज थॉमस, डॉ. शोभना एकबोटे, डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. श्रीनिवास पांचाळ, श्री. प्रवीण जैन, श्री. अंकित खंडागळे. KCPS च्या वतीने पॅरामेडिकेल विभाग प्रमुख – डॉ. छाया खेडकर, व्यवस्थापिका सीमा तांदुळजे, आणि प्लेसमेंट विभाग विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
