मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा स्पर्धेत श्री.विठ्ठल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारणी (सा) प्रथम..!

शाळेला मिळाले 3 लाखाचे पारितोषिक,केज तालुक्यातुन पटकावला प्रथम क्रमांक.!
केज प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ मध्ये केज तालुक्यातून सारणी (सांगवी) येथिल श्री.विठ्ठल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला असून शाळेला ३ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतिने घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -२ ची केज तालुकास्तरीय स्पर्धा नूकतीच तहसिलदार,गटविकास अधिकारी,गटशिक्षण अधिकारी यांच्या नेतृत्वात पार पडली.स्पर्धेत शाळेतील भौतिक सुविधा,विद्यार्थी गुणवत्ता,शाळेतील स्वच्छता आदी बाबींना धरून शाळेची निवड करण्यात येते.तालुकास्तरीय झालेल्या स्पर्धेत सारणी (सांगवी) येथिल श्री.विठ्ठल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकवला आसून शाळेला ३ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे.

दरम्यान गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल केंद्रे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी चाटे, केंद्रप्रमुख धम्मदीपा दरबारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.विठ्ठल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारणी (सा) या शाळेने केज तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आसून शाळेने ३ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.

शाळेच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे, संस्थेचे अध्यक्ष विजयकांत मुंडे,सचिव अतुल मुंडे,प्राचार्या माधुरी मुंडे मॅडम सर्व खातेप्रमुख,यांनी प्राचार्य सचिन हांगे सर,पर्यवेक्षक उद्धव मुरकुटे सर,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,संपूर्ण स्टाफ यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.