बीड

आष्टी मतदार संघातील प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करा ,जनतेच्या कामांना प्राधान्य द्या – आ.सुरेश धस

मतदार संघात नवनवीन योजना राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवावी

आष्टी –
गेल्या दहा वर्षांपासून आष्टी मतदार संघात प्रशासकीय यंत्रणेचा सुरू असलेला अनागोंदी कारभार माझ्या काळात मी खपवून घेणार नाही. तसेच मतदार संघातील रखडलेले प्रकल्प जलदगतीने पूर्ण कसे होतील यासह सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्राधान्यक्रमाने सोडवून मतदार संघात नवनवीन योजना राबविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून विकास कामांना गती देण्याची गरज असल्याचे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी सायं ६ वा. आष्टी पंचायत समिती कार्यालय सभागृहात बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत आष्टी , पाटोदा , शिरूर तालुक्यातील कृषी व पाटबंधारे विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत , प्रलंबित खुंटेफळ साठवण तलाव योजने संदर्भात जलद गतीने पावले उचलून कामास गती देणे. वन विभागाच्या क्षेत्रावर असलेल्या ग्लिरिसिडीया या वनस्पतीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे विदारक चित्र समोर येत असून त्या ऐवजी वड ,पिंपळ आदी वृक्षांची लागवड मनरेगाच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने करणे ,सिंदफणा प्रकल्पाची उंची वाढविणे ,सुरत चेन्नई या महामार्गासाठी आष्टी मतदार संघातून जात असलेल्या राष्ट्रीय मार्ग-४६ रस्त्याबाबत जमीन अधिग्रहण करणे ,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाच्या फेऱ्या वाढवणे तसेच मच्छिंद्रनाथ गडावर मुक्कामी बस सुरू करणे ,
पिंपळा ,लोणी मार्गे अहमदनगर ही बस सुविधा यासह महिंदा , मोराळा ,पाटसरा यासह ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बस सेवा उपलब्ध करून देणे.,जिल्हा परिषद ,अंतर्गत कार्यरत शिक्षण विभाग , ग्रामसेवक ,प्राथमिक आरोग्य केंद्र , पशुवैद्यकीय दवाखाना येथे अधिकारी कर्मचारी यांची प्रमाणित बिंदूनामावली तपासणे ,जिल्हापरिषद शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे , प्राथमिक पदवीधर , विस्तार अधिकारी ,मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे ,काही ग्रामपंचायत मध्ये सरपंच ,ग्रामसेवक यांना विचारात न घेता बोगस सह्या करून पैसे उचलले आहेत. त्यांच्यावर तत्काळ कार्यवाही करणे ,सावरगांव परिसर अविकसित क्षेत्र घोषित जिल्हा परिषद लघुपाटबंधारे ,जलसंधारण विभाग गावतलाव ,पाझर तलाव दुरुस्ती करणे ,वीज वितरण विभागाच्या टाकळी (अ)- अतिक्रमण नवीन सबस्टेशन , सोलार पंप ,अतिरिक्त होणाऱ्या विदयुतदाबा बाबत निर्णय घेणे.शिराळ आणि महिंदा- येथील उपकेंद्रासाठी जागा खरेदी करणे , मोराळा येथील ४२ एकर जागेचा विचार करणे ,आष्टी ,पाटोदा ,शिरूर (का) येथील नवीन बस स्थानक कामांचा वेग वाढवणे ,
पैठण-पंढरपूर पालखी मार्ग भुसंपादन अतिक्रमण यामुळे शिरूर का. शहर , डोंगरकिन्ही(मळेकरवाडी) , पाटोदा शहर (पारगाव रोड) इ.ठिकाणी काम वन विभाग परवानगी घेऊन पूर्ण करणे ,पांगरी-जाधववाडी साठवण तलाव
भुसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे , शेती ,झाडे , पक्की विहीर यांचे मूल्य मापन पूर्ण करणे ,उखळवाडी – जाटनांदूर साठवण तलाव भूसंपादन अपूर्ण असून गाॅर्ज (घळभरणी) बुज‌वणे काम बाकी ,नष्ट मालमत्तेचे मुल्यमापन करणे ,सिंदफना प्रकल्प ,खोलीकरण व उंची वाढविणे ,सर्व क्षेत्र बागायती होणे साठी कॅनॉल दुरुस्ती करणे ,वाघाचावाडा साठवण तलावाचे काम वेगाने सुरू करणे यासह विविध विषयांवर चर्चा झाली

.तसेच १३ जानेवारी २०२५ पासून आष्टी मतदारसंघात व्ही रमणी आणि जरेवाडी पॅटर्न सुरू होणार असून यामुळे शाळाबाह्य होत असलेल्या ऊसतोड मजुरांची मुले मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शिक्षण सुविधा सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी हा पॅटर्न अत्यंत महत्त्वाचा असून त्याची अंमलबजावणी करणे यासह विविध विषयांवर चर्चा झाली.

यावेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव ,उपविभाग अधिकारी पाटोदा वसिमा शेख ,बीड पाटबंधारे विभाग वरिष्ठ अभियंता चिस्ती , वरिष्ठ अभियंता थोरात धाराशिव पाटबंधारे विभाग ,कार्यकारी अभियंता कृष्णाजी घुगे कृष्णा खोरे ,कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ , कार्यकारी अभियंता पवार , कार्यकारी अभियंता गलांडे ,कार्यकारी अभियंता आमले ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटे जिल्हा परिषद बीड ,जिल्हा वनसंरक्षक अधिकारी गर्कळ , वनविभाग प्रादेशिक, सांगोळे वन्यजीवलजल मयूर अभयारण्य , तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील मॅडम , परिवहन विभाग नियंत्रक दुसाने मॅडम , मृद व जलसंधारण व अभियंता जलसंपदा उपाभियंता लाभक्षेत्र अधिकारी पोलीस निरीक्षक भुतेकर यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button