बीड

बीड शहरात दिव्यांगांसाठी मोफ त नाष्टा व चहा देण्याचा बालाजी लोंढेंचा स्तुत्य उपक्रम

बीड – डॉ.शामसुंदर रत्नपारखी/मोहन घोडके
समाजसेवा करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो आणि ते वेगवेगळ्या प्रकारे करतही असतात. राष्ट्रसेवा हिच इश्वर सेवा असे समजणारे व्यक्ती या समाजात कमी नाहीत. समाजात सतत उपेक्षित समजला जाणारा वर्ग म्हणजे दिव्यांग होय, अशा दिव्यांग बांधवांसाठी आपल्या हॉटेलमध्ये मोफ त पोटभर जेवू घालणारे बालाजी हॉटेलचे मालक बालाजी लोंढे यांचा हा स्तुत्य उपक्रम बीड शहराच एक भूषण ठरत आहे.


बीड शहराचा काहीसा शांत भाग म्हणून ओळखला जाणारा तुळजाई चौक जेथे चकचकीत असे चौहबाजूने झालेले सिमेंटचे रस्ते तसा फ ारसा रहदारीचा भागही नाही किंवा बीड शहराच्या मध्यवर्ती असे ठिकाणही नाही. परंतु दिवस आणि रात्रीचे 10 वाजेपर्यंत बर्‍यापैकी माणसांची ये-जा व तुरळक गर्दीचा भाग समजला जातो. अशा या चौकापासून थोड्याच अंतरावर आशा चित्रपट मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर बालाजी हॉटेल सुरु होवून दोन तीन महिने झाले असेल.


या हॉटेलचे मालक बालाजी लोंढे हे मागील पंधरा वीस वर्षापासून हॉटेल व्यवसायात कार्यरत आहेत आणि त्यांनी हे हॉटेल नव्याने सुरु केले आहे. समाजाबद्दलची एक भावना आपल्या मनात घोळत आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि समाजासाठी काहीतरी करावे असे त्यांच्या मनाने पक्के केल्यानंतर काय उपक्रम राबविता येईल असा विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की समाजामध्ये सतत उपेक्षित राहिलेला वर्ग म्हणजे दिव्यांग. या दिव्यांग बांधवांसाठी त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये एक सुंदर आणि स्तुत्य असा उपक्रम सुरु केला की, जे दिव्यांग बांधव आपल्या हॉटेलमध्ये येतील त्यांना मोफ त व पोटभर नाष्ट व जेवण द्यायचे.


बालाजी लोेंढे यांनी नवीन वर्षात या उपक्रमाची सुरुवात केली असून 1 जानेवारी 2025 पासून त्यांनी उपक्रमावर अमंलबजावणी सुरु केली. त्यादिवसापासून रोज 7 ते 8 दिव्यांग बांधव त्यांच्या हॉटेलमध्ये येतात. या सर्वांना बालजी लोंढे हे मोफ त नाष्टा व जेवण देतात. हे दिव्यांग बांधव बालाजी लोंढे यांना पैसेही देतात परंतु लोंढे त्यांच्याकडून एकही रुपायही घेत नाहीत.


ऐकाकी झुंज
बालाजी लोंढे यांनी दिव्यांगासाठी मोफ त नाष्टा व जेवण्याची सुुविधा सुरु केली असून यासाठी त्यांनी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची मदत घेतलेली नासून आपल्याच दररोजच्या उत्पन्नातून ते हा उपक्रम चालवितात. यासाठी लागणारा खर्चही ते स्वतःच करत असतात.


त्यांनी वृत्तपर्वशी बोलताना सांगितले की हा उपक्रम ते मागील दहा वर्षापासून चालवित होते परंतु कधीही कोणापाशी याचा गाजावाजा केला नाही. परंतु समाजाला हे माहिती व्हावे व अनेक दिव्यांगाना याची माहिती व्हावी व त्यांनी लाभ घ्यावा यासाठी अनेकांच्या आग्रहास्तव हॉटेलमध्ये ही पाटी लावली आहे.

बालाजी लोेंढे यांच्या उपक्रमाची बीड शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असून दिव्यांग बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत की कोणीतरी आपल्या पाठिशी आहे याची भावनाही ते लोंढे बरोबर बोलताना आर्वजून बोलून दाखवितात.

बालाजी लोंढेची विशेष मुलाखत आमचे यूटयूब चॅनल Maharashtra wrutt parv news वर पाहू शकतात व आमचे साप्ताहिक वृत्तपर्वमध्येही मुलाखत प्रसिध्द झाली आहे.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button