परत जोरदार आपटला, अजून किती दिवस राहणार अस्थिरता ?

मुंबई – शेअरबाजार परत एकदा आपटला असून विदेशी गुंतवणूकदारांनी परत एकदा गुंतवणूक काढून घेतल्याचा परिणाम आज शेअरबजार परत एकदा जोरदार कोसळला असून डॉलरच्या तुलने रुपया 86 वर गेल्याचे कारण सांगत अस्थिरता परत एकदा जोर पकडत आहे.
भारतीय शेअरबाजार विदेशी गुंतवणूकीवर अवलंबून असल्याने त्यांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुच ठेवल्याने शेअर बाजार आठवडयाच्या शेवटीही जोरदार आपटला आहे. अमेरिकेत बेरोजगारी संबंधीची आंकडेवारी प्रसिध्द होण्याच्या आधी बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे कारण दाखवत गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. याच बरोबर कच्च्या तेलाच्या किंमतीही वाढल्याचे सांगण्यात येत असल्याने बाजारावर याचा विपरीत परिणाम दिसून आला.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा राष्ट्रीय सूचकांक अर्थात निफटी 95 अंश अर्थात 0.40 टक्क्याने घसरुन 23,431.50 रुपयांवर पोहचला. 50 शेअवर आधारीत निफटीतील 14 शेअरमध्ये तेजी राहिली तर 36 शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे.
मुंबई स्टॉक्स एक्सचेंज अर्थात सेंसेक्स 241.30 अंश अर्थात 0.31 टक्क्याने घसरुन 77,378.91 रुपयांवर पोहचला आहे. यातील 30 शेअरपैकी 8 शेअरमध्ये तेजी राहिली तर 22 शेअरमध्ये जोरदार घसरण दिसून आली.
शेअर बाजारात सर्वांत मोठी घसरण ही बँक निफटीमध्ये दिसून आली असून 769.35 अर्थात 1.55 टक्क्याच्या घसरणीसह 48,734.15 रुपयांवर पोहचला आहे. यातील 12 शेअरपैकी एयूबँकेच्या शेअर सोडला तर 11 शेअरमध्ये घसरण दिसून आली आहे.
तज्ञ लोकांचा अंदाज आहे की शेअरबाजारातील ही घसरण 20 जानेवारीपर्यंत अशीच चालू राहिल कारण या दिवशी अमेरिकेत सत्ताहस्तांतरण होणार आहे आणि डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर अमेरिकेचे आर्थिक धोरण निश्चित होईल व बाजारातील संकेत कळतील.
Thanks for the photo – wikipedia.org/